नेवासा – जीवनाच्या वाटेवर बिकट प्रंसगी सर्व जण साथ सोडु शकतात पण आई वडील कधीच साथ सोडत नाहीत स्वतः ची सावली सुध्दा ज्यावेऴी साथ सोडते त्या क्षणीसुध्दा आई वडील आपली सावली बनतात. म्हणून आई वडीलांची कधीच साथ सोडु नका. आणि त्यांना वृध्दाश्रमाची वाट दाखवू नका असा अनमोल संदेश अर्हम् विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर परम पूज्य श्री प्रविणऋषिजी महाराज यांनी आनंदतीर्थ चिचोंडी शिराळ येथे देसरडा परिवाराच्या वतीने आयोजित विरमाता श्रीमती चंपाबाई दगडूरामजी देसरडा (घोडेगाव )यांच्या मातृपुजन व मातृभक्ती या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित हजारो भक्तांना दिला.
या वेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.ना.रामजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार विठ्ठलराव लंघे, गुरु आनंद तीर्थ चे अध्यक्ष सतीशजी सुराणा, हार्दिक देसरडा यांची भाषणे झाली..या मातृपूजन सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रम स्थळी रक्तदान शिबीर घेण्यात आले..पुणे येथील सुप्रसिद्ध गायक रितिक ओस्तवाल यांनी आपल्या खास शैलीतून मातृभक्ती गाणी सादर केली.. अत्यंत भावपुर्ण आणि मंगलमय वातावरणात विरमाता श्रीमती चंपाबाई दगडुरामजी देसरडा यांच्या 90 व्या वाढदिवसाच्या निमीत्ताने आयोजित या कार्यक्रमसाठी मधुर गायक पूज्य श्री तिर्थेश ऋषीजी म.सा, वाणीभुषण साध्वी परम पूज्य श्री प्रितीसुधाजी म. सा.परम पूज्य सुनंदाजी म सा, परम पू. प्रितीदर्शनाजी म .सा. यांच्या मंगल उपस्थितीत संपन्न झाला

उपाध्याय प्रवर परम पूज्य श्री प्रवीण ऋषिजी म सा यांनी राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषिजी म सा नी केलेली देव गुरु धर्म व समाजाची देशाची सेवा सदैव सर्वाना स्मरणिय आहे.. महाराष्ट्र शासनाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून गौरांवित केले आहे त्यांची दिक्षाभुमि मिरी येथे असनु ती जागा सरकारी आहे आणि जन्मभुमी प्रमाणे दिक्षाभुमीचाही विकास करावा ही जैन समाजाची 20-25 वर्षिपासुन इच्छा आहे परंतु ती जागा जर महाराष्ट्र शासनाने जैन समाजाच्या व दिक्षा भुमि विकास ट्रस्ट ला सपुर्त केली तर मोठे स्मारक त्या ठिकाणी समाज उभारेल ती जागा उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा आपल्या प्रवचनात व्यक्त केली त्याला विधानपरिषदेचे सभापती ना.प्रा. राम शिंदे यांनी शासकीय पातळीवर पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला.. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी त्वरीत हा प्रश्न सोडवुन त्याचे पालकत्व स्विकारकरण्याची घोषणा आपल्या भाषनात करताच हजारो भाविकांनी टाऴ्यांचा कडकडात केला..

मंत्री विखे यांनी चिंचोडी येथील गुरु आनंद तीर्थ ला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन विरमाता चंपाबाई देसरडा यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.. या कार्यक्रमास प्रमुख अतिथि म्हणून हभप रामेश्वर महाराज शास्त्री हभप झरेकर महाराज,आमदार संग्रामभैय्या जगताप, मा. आमदार संभाजीराव फाटके, मा. आमदार पांडुरंगजी अभंग,गुरु आनंद तीर्थ चे अध्यक्ष सतीशजी सुराणा, सुभाषजी मुथा, सचिन नहार तसेच सर्व ट्रस्टी, ऍड अभय ओस्तवाल, डॉ. राजेंद्र पिपाडा,उदयोगपती राजूभाऊ चोपडा, जैन कॉन्फरन्स चे अध्यक्ष बाबुशेठ बोरा, अशोक पितळे, विलास कटारिया, संतोष शेटीया, पंचगंगा शुगर चे प्रभाकरजी शिंदे,भानुदास बेरड सर,सुवेंद्र गांधी, वसंतशेठ लोढा, किसनराव गडाख,देवळाली चे नगराध्यक्ष सत्यजित कदम,
मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे,संभाजी नगर चे उपमहापौर प्रशांत देसरडा भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मुळा पाटबंधारे च्या सायली पाटील,पाथर्डी चे तहसीलदार डॉ उद्धव नाईक, पाथर्डी चे पोलीस निरीक्षक मुटकुळे साहेब,सोनई चे पोलीस निरीक्षक माळी साहेब नगरसेवक संजय चोपडा, विपुल शेटीया,चिंचोडी चे सरपंच एकनाथ आटकर, वैभव खलाटे, संजय आव्हाड, तसेच सर्व पदाधिकारी, अधिकारी, मित्र परिवारा सह मोठा जनसमुदाय उपस्थित होता..या प्रसंगी घोडेगाव जैन श्री संघाच्या वतीने वीरमातेचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच तनिष्का संदिप देसरडा हिने मातोश्री च्या काढलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.मान्यवरांचे सर्वांचे स्वागत मदनलाल देसरडा, घोडेगाव चे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र देसरडा यांनी केले तर भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांनी उपस्थितांचे आभार मानले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोचेटा सर तसेच संतोष कुवाड यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सचिन देसरडा मित्र मंडळ आणि नेवासा सकल जैन श्री संघ,घोडेगाव श्रावक संघ,चिंचोडी श्रावक संघ, चिंचोडी ग्रामस्थ यानी विशेष परिश्रम घेतले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.