नेवासा – जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २० वे जागतिक संमेलन ‘शोध मराठी मनाचा’ येत्या दि. १० ते १२ जानेवारी दरम्यान सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक माजी खा. यशवंतराव गडाख पाटील यांनी दिली आहे.
याविषयी माहिती देताना गडाख म्हणाले, २० व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पद्माविभुषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार, कवी तसेच प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

जागतिक मराठी परिषदेच्या माध्यमात्न यापूर्वी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर नाशिकसह गोवा, आदी विविध ठिकाणी संमेलने संपन्न झाली आहेत. यंदाचे २० वे जागतिक मराठी संमेलन साताऱ्यात होणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी जागतिक मराठी भूषण पुरस्काराने उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना तर ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांना जागतिक मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी शोध मराठी मनाचा या उपक्रमाद्वारे चित्रपट, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, अशा परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भारतीयांचा मुलाखतीतून जीवन प्रवास उलगडणार असल्याचे गडाख यांनी सांगितले.

दरम्यान, या संमेलनाचा समारोप दि.१२ जानेवारी रोजी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. जागतिक मराठी अकादमीचे संमेलन यशस्वी होण्यासाठी जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक रामदास फुटाणे व अकादमीचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.