सोनई – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व मुळा एज्युकेशन सोसायटीचे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रिवेणीश्वर हांडीनिमगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामध्ये श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा व अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या भूमिकेतून तरुणांमध्ये जन जागृती करण्यात आली.तसेच रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यामध्ये रक्ताचा असणारा तुटवडा व त्यामुळे होणारे मृत्यू याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.शिबिरामध्ये रोहित महेर , पवनकुमार आल्हाट , मंदार लष्करे, वैभव चिमणी , आदित्य वरणे, कल्याण गर्जे ,विशाल घोलप ओमकार लष्करे गौतम कुदळे ,गवळी शुभम गवळी, मयूर भणगे, विशाल हापसे ,वेदांत बोलके , पवन भुसारी, अक्षय वरगुडे , सुनील दळे या 18 स्वयंसेवकांनी रक्तदान केले यानंतर दुपारच्या सत्रात सर्व स्वयंसेवकांची हिमोग्लोबिन व एच आय व्ही तपासणी करण्यात आली यासाठी नेवासा ग्रामीण रुग्णालय येथील टीम यांनीही तपासणी केली या शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. नवनाथ आगळे सहकार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश गारूळे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. कार्तिकी नांगरे यांनी कष्ट घेतले याप्रसंगी प्रा.दरंदले स्वप्नाली व प्रा.जाधव ऋतुजा या उपस्थित होत्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.