ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
अंगणवाडी

नेवासा – तालुक्यातील खेडले परमानंद येथील गावठाण हद्दीतील असणाऱ्या अंगणवाडीतील खोलीच्या छताचा काही भाग कोसळला असल्याची घटना घडली आहे. दि.९ रोजी नेहमी प्रमाणे पालकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडून गेले. थंडीचे दिवस असल्याने मुले बाहेर अंगणात बसले होते . अचानक आत मध्ये काही तरी पडल्याचा मोठा आवाज झाला. अंगणवाडी सेविकेने आत मध्ये डोकावून बघितले तर समोरचे दृश्य बघून क्षणभर पायाखालची जमीनच सरकली . इमारतीच्या छतावरील काही भाग कोसळला होता. सन.२०११ साली या इमारतीचे काम झाले होते .

अंगणवाडी

छतावरील काम तत्कालीन संबंधित ठेकेदारांने अपुर्ण अवस्थेत आजपर्यंत ठेवले होते. वरील बाजूस काम करण्यासाठी वाळू साठवून ठेवलेली होती. त्यामुळे पाणी साचून वरील छत ढिसाळ झाले.आधीच कामाचा दर्जा निक्रुष्ठ यामुळे अक्षरशः या चिमुल्यांसाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल.त्यामुळे विद्यार्थी मरता- मरता वाचले आहे.
गेल्या तीन वर्षापासून छतावर पाणि साचते दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती साठी काम सुरू झाले होते पण हे काम बंद का पडल हे मात्र गुपीत आहे. एवढे होऊन सुध्दा कुणाला त्याचे सोयरसुतक नाही.

अंगणवाडी

तत्कालीन ठेकेदार कोण होता , तसेच त्याने हे काम अपुर्ण अवस्थेत का ठेवले त्याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करु नये असा प्रश्न भेडसावत आहे. तालुका अंगणडवाडी निरीक्षक झोपेत आहे का ?असाही प्रश्न उपस्थित होत आहे. येणारा निधी कुठे वापरला गेला, काम झाले कि नाही ,याची पाहाणी झाली नाही का ? संबंधित घटनेला न्याय मिळेल का?

अंगणवाडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अंगणवाडी
अंगणवाडी
अंगणवाडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अंगणवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!