नेवासा – शहरातील प्रणाम हॉल येथे शहर भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक प्रचंड उत्साहात व मोठ्या संख्येत पार पडली, आगामी नगर पंचायत निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन प्रभाग निहाय सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, प्रत्येक प्रभागात किमान 200 ते 250 सदस्य नोंदणी ही आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यावेळी पूर्ण 17 प्रभागाची कार्यकर्त्यांची रचना तयार करण्यात आली. यावेळी बोलताना बैठकीचे संयोजक निरंजन डहाळे म्हणाले की आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी सदस्य नोंदणी अनिवार्य असुन कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी अभियान राबवण्याची सुचना केली.

भाजपा सदस्य नोंदणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवुन शहराचे युवा नेते मनोज पारखे यांनी सांगितले की संभ्रमात न राहता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करा जेणेकरून याचा फायदा आगामी निवडणुकीत आपल्यालाच होईल आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या शासकीय व सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पक्ष व नेते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मत व्यक्त केले.
जेष्ठ नेते एड विश्वास काळे यांनी शहरातील कार्यकर्त्यांचा उत्साह व संख्या बघुन समाधान व्यक्त करत मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी एकाचवेळी १०० पेक्षा जास्त भाजपा सदस्य नोंदणी करण्यात आली.

याबैठकीस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे पाटील यांच्यासह खंडाळे सर, डॉ करण सिंह घुले, राजेशजी कडु पाटील, अजितसिंह नरुला, कृष्णाभाऊ डहाळे, आप्पासाहेब गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ खंडाळे सर, सुरेशकाका नळकांडे, अरविंदजी मापारी, श्रीपतकाका दारुंटे, डॉ लक्ष्मणराव खंडाळे, बाळासाहेबजी कराळे, संजीवजी शिंदे, उदयकुमार बल्लाळ साहेब, एड नाना काळे यांच्यासह असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.