सोनई – महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यामध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये घेण्यात आल्या. यातील इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत श्री शनीश्वर विद्या मंदिर,सोनईने घवघवीत यश संपादन केले आहे. इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत विद्यालयातून ५५ विद्यार्थी बसले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘अ’ श्रेणीत – २० ‘ब’ श्रेणीत- १३ व ‘क’ श्रेणीत – २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
‘अ’श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी- अक्षदा पवार,आनंद निमसे, अनुष्का मोरे,भक्ती गडाख,भूमिका दरंदले, चैताली दरंदले,

धनश्री दरंदले,गौरी चौधरी,गोवर्धन गाडेकर,गुरुवेष कुरकुटे,कल्याणी गायकवाड, कार्तिकी गडाख,निखिल गडाख, प्रिती कैदके,संकेत भुसारी, श्रद्धा थावरे,सिद्धी जंगले,सुप्रिया पवार, वैष्णवी लोकरे,वैष्णवी येळवंडे, ‘ब’श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी
आकाश निमसे,अनुष्का गडाख, ज्ञानेश्वरी बडे,हर्षदा हिवाळे,कार्तिकी दातीर,नंदिनी दरंदले,निखिल भुसाळ, निरंजन झिने,रिया साळवे, ऋचा रासने,सत्यम निमसे,श्रुती कदम,वेदांत गडाख या यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संजय पुंड यांचे मार्गदर्शन लाभले.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे,सहसचिव डॉ.विनायक देशमुख,प्रशासन अधिकारी डॉ अशोक तुवर, विद्यालयाचे प्राचार्या इंदुमती खंडागळे, उप मुख्याध्यापक ई.टी. गवळी पर्यवेक्षक शिवाजीराव कर्जुले व शिक्षक वृंद, पालक, ग्रामस्थ,मित्रपरिवार,विद्यार्थी यांमधून अभिनंदन होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.