नेवासा – कै. सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयात मकरसंक्रांत निमित्त पर्यावरण पुरक पतंग बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये विद्यार्थिनींच्या कल्पकतेला वाव मिळावा तसेच ज्ञानाबरोबर इतर उपक्रमांची आवड निर्माण व्हावी तसेच मुलीनी पतंग बनविण्याची कला जोपासली तर भविष्यात ते या क्षेत्रात करिअर करू शकतात तसेच पतंग बनवताना विद्यार्थिनींना अतिशय आनंद वाटला आमच्या हातून सुंदर असे पतंग बनवताना आमचा आत्मविश्वास वाढल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले या विद्यार्थिनीना कलाशिक्षिका सुजाता गोरे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या स्मिताताई पानसरे पर्यवेक्षिका दिघे मॅडम शिक्षिका व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.