नेवासा – राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने मक्तापूर येथे मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांच्या पुढाकाराने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मक्तापूर वेशी जवळील मंदिरातील सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध क्षेत्रातील मान्यवरांना समितीच्या वतीने पुरस्कार देण्यात आले.
यावेळी जिजाऊ पुरस्कार सौ प्रिया प्रभुणे मॅडम यांना प्रदान करण्यात आला. मराठा भूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते डॉ करण सिंह घुले यांना तर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आम्ही नेवास करचे सहसंपादक अभिजीत गाडेकर यांना प्रदान करण्यात आला. पोलीस पाटील रामचंद्र लहारे पुरस्कार हा मक्तापूर येथील कुमारी प्रणाली मायकल साळवे यांना शिक्षण क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला तर हस्ताक्षर स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणारा आदिनाथ खैरे याचा विशेष सत्कार यानिमित्ताने करण्यात आला.

आपल्या सत्कारास उत्तर देताना डॉ. करणसिंह घुले म्हणाले की महाराष्ट्रातील मराठा या शब्दाची व्यापक अशी व्याख्या या निमित्ताने करायला हवी. सर्व 18 पगड जाती एकत्र करून मायभूमीच्या परम वैभवासाठी झटणारा व मराठीत भाषिक अस्मितेचा अभिमान बाळगणारा म्हणजे मराठा होय. समर्पण द्वारे सर्व समाजातील तळागाळातील लोकांच्या उद्धाराकरिता निरंतर काम करून शिक्षण व आरोग्य या क्षेत्रामध्ये भरीव उपक्रम करण्याचा मानस आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व विशद केले. व परिसरासाठी कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले. पोलीस उपनिरीक्षक संजीव गायकवाड यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संदर्भातील ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मक्तापूर तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय कांगुणे होते. या कार्यक्रमात मुख्याध्यापक चव्हाण सर तसेच कार्यक्रमाचे आयोजक गणेश झगरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुद्दिनपूरचे पोलीस पाटील आदेश साठे यांनी केले तर सूत्रसंचालन सुदर्शन विद्यालयाचे शकूर इनामदार सर यांनी केले आणि रवींद्र महागावे सर यांनी मानले.
याप्रसंगी मसाजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील मयत सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या घडलेल्या हत्येच्या घटनांचा निषेध करण्यात आला. यावेळी सभापती रावसाहेब कांगुणे , सरपंच अनिल अनिल लहारे ,पोलीस पाटील आदेश साठे ,पोलीस पाटील संदीप लहारे ,आबासाहेब शिरसाठ खासदार वाकचौरे चे स्वीय सहाय्यक बाळासाहेब सोनवणे ,सचिन कुंद, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे,

पत्रकार अभिषेक गाडे ,रविराज महागावे, मुख्याध्यापक सुभाष चव्हाण लक्ष्मण बर्डे ,आजिनाथ जामदार, रोहित जामदार ,विशाल कर्डक, तन्मय पांडागळे, सुनील साळवे, सुभाष बर्डे ,गंगाराम लहारे, अमोल भागवत ,साहेबराव निपुंगे ,जॉईस साळवे ,मोहन सातपुते, सचिन गायकवाड ,पप्पू साळवे, उपसरपंच गोरक्षनाथ पाटील बर्डे माजी सरपंच रामकृष्ण कांगणे, अंबादास कांगुणे,अविनाश जामदार, मनोज झगरे योगेश जामदार, दत्तात्रय कोळेकर सर ,शिवसेनेचे माऊली देवकाते ,रामदासजी गोल्हार ,जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे ,अंशा बापू नवघरे, गोरक्षनाथ नवघरे ,वंचित चे योगेश गायकवाड ,मयूर साळवे, अक्षय मगर, संजूबाबा गायकवाड , योगेश राऊत, अशोक माळी, अजय गोरक्षनाथ बर्डे ,अमोल घुले ,ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ कराडे ,सचिन कोळेकर ॲड. सुदाम ठुबे ,प्रकाश कोळेकर, सुर्यकांत बर्डे अशोक साळवे,ग्रामसेवक दत्तात्रय गर्जे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.