नेवासा – गंभीर जखमी करणा-या गुन्हयांतील आरोपीस मा न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.पोलीस ठाणे नेवासा अभिलेखावर भारतीय दंड संहिता कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, २०१ अन्वये दाखल गुन्हयांतील आरोपी नामे ज्ञानेश्वर किसन चोपडे रा शिरसगांव ता नेवासा जि अहिल्यानगर यास नेवासा येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब कोर्ट क्रमांक ४ श्रीमती एस. व्ही. जाधव साहेब यांनी आरोपीस १) भा.द.वि.क ३२६ या गुन्हयासाठी तीन वर्षाचा सश्रम कारावास व दंड ५०००/- २) भा.द.वि.क. २०१ या गुन्हयासाठी एक वर्षाचा सश्रम कारावास व दंड १०००/- अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सदर गुन्हा नेवासा पोलीस स्टेशनला दिनांक ०१/०२/२०२४ रोजी दाखल झाला होता.

सदर गुन्हयांमध्ये आरोपी ज्ञानेश्वर किसन चोपडे रा शिरसगांव ता नेवासा याने त्यांचा सख्खा भाऊ श्री. गणेश किसन चोपडे रा. सदर यास सामाईक शेती वाटपाच्या कारणावरुन लाथा बुक्याने मारहान , शिविगाळ, दमदाटी व खाली पाडुन खो-याने डाव्या डोळयाच्या कपाळावर मारहान करुन गंभीर जखमी केले व गुन्हयांत वापरलेले खोरे हे पाण्याने धुउन काढले व पुरावा नष्ट केला होता सदर बाबत जखमीचे वडील श्री. किसन दादा चोपडे रा सदर यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयांचा तपास पोना अशोक कुदळे यांनी केला सदर गुन्हयामंध्ये त्यांनी प्रत्यक्षदशी साक्षीदार, पंचासमक्ष हत्यार जप्त असा तपास करुन सदर गुन्हयांचे दोषारोप पत्र मुदतीत मा.न्यायालयात दाखल केले होते.

सदर केसमध्ये अभियोग पक्षाचे वतीने एकुण ११ साक्षीदार तपासण्यात आले होते. सदर केसमध्ये विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री एस. एस. चव्हाण यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरुन सदर आरोपीस मा न्यायालयाने वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीस तातडीने ताब्यात घेण्याबाबत मा. न्यायालयाने सुचना दिल्याने आरोपीस ताब्यात घेउन न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.. सदर गुन्हयांचा तपास पोलीस ठाणे नेवासा येथील अंमलदार पोना अशोक कुदळे यांनी केला असुन अभियोग पक्षाचे वतीने विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. एच. चव्हाण यांनी कामकाज पाहिले त्यांना पैरवी अधिकारी पो.हवा / ६८० राजु शंकर काळे यांनी सहकार्य केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.