नेवासा – मंदिराला दिलेले दान हे खऱ्या अर्थाने सत्पात्री दान व पुण्यकर्म असल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर मंदिराचे देविदास महाराज म्हस्के यांनी केले. पुत्रदा एकादशी निमित्त नेवासे येथील मुथ्था परिवाराकडून संकल्प पूर्ण करीत संत ज्ञानेश्वर मंदिरांना शंभर खुर्च्यांचे दान देण्यात आले यावेळी ते बोलत होते. 1973 पासून मुथ्था मेडिकल स्थापनेपासून व 2014 मध्ये जननी गोल्ड खाद्यतेल व साबुदाणा उत्पादनात यशस्वी असलेला मुथ्था परिवार धार्मिक कार्यामध्ये व गोरगरिबांना मदत करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतो. या कार्यक्रमावेळी मुथ्था परिवाराचे सर्व सदस्यांसह मंदिराचे प्रमुख विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग व समर्पण फाउंडेशनचे डॉक्टर करणसिह घुले हे प्रमुख उपस्थित होते उपस्थिताचे स्वागत व सूत्रसंचालन डॉक्टर संजय सुकाळकर यांनी केले.

मागील वर्षी संजीवन समाधी सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर मंदिराला 100 खुर्च्यादान करण्याचा संकल्प मुथ्था परिवाराने केला होता पुत्रदा एकादशीनिमित्त छोटे खानी समारंभात या नीलकमल कंपनीच्या शंभर खुर्च्या दिलीप शेठ मुथ्था यांच्या हस्ते मंदिराचे प्रमुख विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग व देविदास महाराज मस्के यांनी स्वीकारल्या. यावेळी देविदास महाराज म्हस्के म्हणाले की आपल्या संस्कृतीमध्ये दानाला महत्त्व आहे अन्नदाना पाठोपाठ सर्व दाने करताना ते सतपात्री व्हावे अशी धारणा आहे आणि मंदिराला दिलेले दान हे तर पुण्य कर्म देखील आहे मोठ्या परिवाराने दिलेल्या खुर्च्यांचे दान हे सर्व जेष्ठ भाविकांना सुखदायी ठरेल असे उपयोगी दान आहे असे त्यांनी स्पष्ट केल. अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी मुथ्था परिवाराचे सदस्य रवी शेठ मुथ्था, अभयशेठ मुथ्था, संतोषशेठ मुथ्था, अजय शेठ मुथ्था ,अभय बलाई यांचा सत्कार केला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.