नेवासा – तालुक्यातील प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र श्रीगुरुदेव दत्तपीठ श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथून वाहणाऱ्या अमृतवाहिनी प्रवरानदी वरती साधारण आठ वर्षांपूर्वी प्रादेशिक पर्यटन विकास विभागाने पादचारी पूल या कामास प्रशासकीय मान्यता दिली होती. सदरील काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयो (कार्य) विभाग अहिल्यानगर यांच्या कार्यालयामार्फत या कामाच्या निविदा प्रकाशित करण्यात आल्या होत्या व सदरील कामाचे कार्यारंभ आदेश संगमनेर येथील विजय दिघे यांना देण्यात आले होते. संबंधित ठेकेदारांनी प्रत्यक्ष काम सुरुवात करत तत्कालीन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदरील काम हे सुरू करण्यात आले.

परंतु मागील पाच वर्षाच्या कालखंडामध्ये प्रवरा नदी पात्रात पाणी असल्याकारणाने सदरील काम हे पूर्णतः बंद आहे व शासनाची दरसूची (डिसआर) ही बदललेला असल्याकारणाने संबंधित ठेकेदारास निर्धारित रकमेचे काम पूर्ण करणे शक्य नाही. त्या अनुषंगाने नव्यानेच आमदार झालेले विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री दंडगव्हाळ व उपअभियंता सुरेश दुबाले शाखा अभियंता बी. टी. सोनवणे यांना उर्वरित काम पूर्ण करून घेण्यासाठी किती रक्कम लागेल व उर्वरित काम कशा पद्धतीने पूर्ण करता येईल यासंदर्भात डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत सूचना केल्या.

देवगड येथील शाळेत नदीपलीकडील भालगाव.गोदेगाव. धामोरी. बहिरवाडी. सुरेगाव या परिसरातील शालेय विद्यार्थी हे रोज नदीपात्र नावेच्या साह्याने ओलांडत असतात. तसेच भौगोलिक दृष्ट्या या परिसरातील नागरिकांचे निवास एका बाजूला व शेत जमीन नदीपात्रापलीकडे असल्याने त्यांना रोजच नदीपात्रातून प्रवास करावा लागतो. तसेच श्री दत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड येथे येणाऱ्या भक्त यांनाही नेवासा किंवा सिद्धेश्वर मंदिर टोका या ठिकाणाहून मोठा वळसा घालून देवगडला दर्शनासाठी यावं लागतं.

श्रीरामपूर तालुका तसेच त्या परिसरातून गुरुवार तसेच एकादशीच्या मोठ्या प्रमाणावर दिंड्या येत असतातह एकंदरीतच दर्शणार्थी भाविक. वारकरी, शालेय विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी यांच्यासाठी बहुउपयोगाचा असलेला हा पादचारी फुल हा लवकरच पूर्ण होण्याच्या आशा परिसरातील नागरिकांच्या प्रज्वलित झालेल्या आहे. श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यास सन्माननीय जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ महोदय व प्रांताधिकारी सुधीर पाटील. तहसीलदार श्री बिराजदार आले असता संस्थांनच्या वतीने पुलाची आवश्यकता व सद्यस्थितीतील कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी ही बजरंग विधाते यांनी करून दिलेली होती.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.