नेवासा : गेल्या डिसेंबर महिन्यापासून राज्यभरात बीड येथील खंडणी व तदनंतर झालेल्या खून प्रकरणाची जोरदार पडसाद उमटत आहेत. बीड येथील एका मोठ्या पवनचक्कीच्या कंपनीला मागितले गेलेल्या खंडणीमुळेच मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला असावा अशी देखील संभावना राज्यभरात प्रकट केली जात आहे.
ही सगळी घटना अजून शांत झाली नाही तर नेवासा तालुक्यात देखील असाच एक खंडणीचा प्रकार घडला असून या प्रकरणात मात्र अहिल्यानगर – संभाजीनगर महामार्गावर असलेल्या एका मोठ्या पंप मालकाला न हरकतीचा दाखला देण्याबद्दल यात बेकायदेशीर व अतिरिक्त रक्कम एका सरपंच व ग्रामसेवकाकडून मागण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. सदरील रक्कम दिली नाही तर पंप बंद पाडू अशी धमकी देखील त्या सरपंच व ग्रामसेवकाने मालकास दिली असल्याची देखील माहिती मालकाने दिली आहे.

सदर मालक पंप मालक युनियन व गावकऱ्यांच्या एका शिष्टमंडळासोबत लवकरच अहमदनगर पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे देखील समजले आहे.
आता सदरील पेट्रोल पंप कोणाचा? ही खंडणी कोणाला मागण्यात आली? तो सरपंच व ग्रामसेवक कोण? हे आता लवकरच समजेल.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.