ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मांजा

नेवासा – नेवासा येथे नेवासा पोलिसांनी मंगळवारी सकाळी रस्त्यावर नायलॉन मांजा विकणाऱ्या एका तरुणाकडून मांजा जप्त करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल रामनाथ साळवे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की १४ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नेवासा खुर्द येथील गंगानगर परिसरात उषा टॉकीज चौकातील डांबरी रस्त्याच्या बाजुला विजय बाळासाहेब बडे (वय २२) रा. गंगानगर नेवासा खुर्द हा नायलॉन मांजा विक्री करताना दिसून आला.

मांजा

या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवितास तीव्र इजा होवून अपघात घडणे किंवा जिवितहानी होवू शकते हे माहिती असताना देखील त्याने महाराष्ट्र शासन निर्देशाची अवज्ञा करुन इतरांचे जिविताची सुरक्षा धोक्यात आणण्याची कृती केली. या फिर्यादीवरुन भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३,१२५ सह पर्यावरण सरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांजा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मांजा
मांजा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मांजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!