सोनई – नेवासा तालुक्यात रासायनिक खत विक्रेता दुकानदारांनी रासायनिक खताची कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू असून त्यामुळे तालुक्यात कृषी खाते अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याला पडला आहे कृषी विभागाने किती टन युरिया खताचा पुरवठा झालेला आहे हे जाहीर करावे कृषी विभागातील संबंधिताला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन रिसीव केला जात नाही, त्यामुळे किती खताचा पुरवठा तालुक्याला झाला आहे. हे समजू शकले नाही. तालुक्यामध्ये खताची कृत्रिम टंचाई करून वाढीव दराने खताची विक्री सुरू केलेली आहे. त्याचबरोबर गव्हाला युरिया खताची आवश्यकता लागते हे ओळखून युरियाच्या गोणी बरोबर शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अनावश्यक असे इतर औषधे घेण्यास भाग पाडले जात आहे.

ही सरळ सरळ शेतकऱ्यांची लूटच असून या औषधाचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग होताना दिसून येत नाही, यावर मात्र कृषी विभागाकडून तालुक्यामध्ये कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही, ही मोठी शोकांतिका आहे रासायनिक खत विक्रेता दुकानांमध्ये शेतकरी चकरा मारून अक्षरशा मेटाकोटीला आला आहे. शेतकरी राजा अनेक संकटांनी वेढलेला असताना बळीराजाला न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यामध्ये नवीन सरकारची स्थापना झाल्या, नंतर सदरचा प्रश्न सुटेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र हा प्रश्न काही सुटताना दिसून येत नाही.

नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी सन्मानित गोष्टीची दखल घेऊन तातडीने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालावे व शेतकऱ्यांचा हा प्रश्न मिटवावा अशी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाईलाजास्तव काही ठिकाणी शेतकऱ्यांना अक्षरशः पाचशे रुपयांना युरियाचे गोणी घेण्याची वेळ आलेली आहे. याकडे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन कृषी विभाग झोपेचे सोंग का घेत आहे याचे विचार ना करणे आवश्यक आहे.
नेवासा पंचायत समितीला मोठ्या प्रमाणात खत विक्रेत्या दुकानदाराकडून मलिदा मिळत असल्याकारणाने संबंधित गोष्टीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे तालुका कृषी विभाग नेमके काय करतोय. संभाजी शिंदे. सामाजिक कार्यकर्ते खेडले परमानंद


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.