नेवासा – मुळा एज्युकेशन सोसायटीचे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा. योगेश साळवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर मधून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी सिंथेसिस कॅरेक्टरिझेशन अँड बायलॉजिकल ऍक्टिव्हिटीज ऑफ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स या विषयांमध्ये विद्यापीठाकडे प्रबंध सादर केला होता. त्यांना सर सय्यद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील प्राचार्य डॉ. कबीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे मा. ना. शंकरराव गडाख, संस्थेचे उपाध्यक्ष मा. उदयन गडाख, सचिव उत्तम लोंढे,

सहसचिव डॉ. विनायक देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे उपप्राचार्य डॉ. अरुण घनवट, डॉ. रवींद्र खंदारे, डॉ. अजय पाटील, डॉ. दिगंबर सोनवणे, डॉ. मच्छिंद्र वर्पे, डॉ. अविनाश साळवे, डॉ. निवृत्ती मिसाळ, डॉ. तुकाराम जाधव, प्रा. बाळासाहेब शिंदे, डॉ. दिनकर आवारे, डॉ. चांगदेव कदम, डॉ. राजेंद्र दारकुंडे, डॉ. संजय घनवट डॉ. सुरेश काळे, डॉ. भिमराज सोनवणे, डॉ. हरिभाऊ कर्डिले, डॉ. सोपान नजन, डॉ. बाळासाहेब जगताप, डॉ. सुभाष आगळे, प्रा. नवनाथ आगळे, प्रा. पुष्पलता घोरपडे, प्रा. नितीन भोगे, प्रा. महेश जंगले, प्रा. शरद औटी यांनी अभिनंदन केले. मुकिंदपुर ग्रामपंचायतचे तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री बाबासाहेब साळवे यांचे पुत्र व सामाजिक कार्यकर्ते श्री पंकज साळवे यांचे ते पुतणे आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.