नेवासा – नेवासा तहसील कार्यालय मध्ये महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी शेत व शिव( पानंद)रस्त्याच्या प्रश्नासाठी व समस्या सोडवण्यासाठी जनन्याय दिन कार्यक्रम घेतला जात असून गुरुवार दिनांक १६ जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळ समितीचे वतीने जनन्याय दिन कार्यक्रमात माननीय तहसीलदार श्री संजय बिरादार नायब तहसीलदार श्री चिंतामणी नायब तहसीलदार किशोर सानप, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे व श्री एस डी कुलकर्णी रोहयो अव्वल कारकून व लिपिक श्री श्रीपत उमाप या अधिकाऱ्यांनी शिव – पाणंद शेत रस्ते चळवळीच्या कार्यकर्त्या बरोबर उपस्थित रस्ता ग्रस्त शेतकऱ्याच्या समस्यावर सविस्तर चर्चा करून शेत रस्ता समस्या निवारणासाठी पुढील कार्यवाहीसाठी प्रत्यक्षात आदेश पारित करीत केले.

त्यामुळे शेत रस्ता व शिव पानंद रस्ता चळवळीच्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीच्या माध्यमातून चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे व समन्वयक श्री दादासाहेब जंगले यांचे मार्गदर्शनाने नेवासा तहसील येथे गुरुवार हा जनन्यायदिन पाळण्याचे तहसीलदार श्री संजय बिरादार यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केले होते त्यानुसार महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी जनन्याय दिन घेण्यात येईल असे तहसीलदार यांनी सुचविले होते त्यानुसार शेत रस्ते शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात जानेवारीच्या तिसऱ्या गुरुवारी न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले .

या जनन्याय दिनास 16 जानेवारी,20 25 रोजी तहसिल कार्यालयातील तहसीलदार संजय बिरादार व रो. ह. यो.अव्वल कारकून श्री कुलकर्णी व उमाप लिपिक यांनी शेत रस्ता प्रकरणे हाताळली . त्यामुळे तालुक्यातील उपस्थित असणाऱ्या ५० -६० समस्याग्रस्त शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले .यावेळी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यां तहसिलदारांचे आदेश होऊनही दोन-तीन वर्षा नंतरही अजून रस्ते बंदच आहेत. रस्ते अडविणारे दाद देत नाहीत. दादागिरी व आडमुठेपणा करुन त्रास देतात. शेती पडीत ठेवावी लागत आहे. आमचे उत्पन्न बंद झाल्याने व मानसिक , शारीरिक , आर्थिक त्रास होत असल्याने आता आम्हाला जलद गतीने न्याय न्याय द्यावा अशी ही मागणी केली यावेळी श्री कुशिनाथ दगडू फुलसौंदर करजगाव, तामसवाडी येथील लक्ष्मण कर्जुले यांच्या प्रकरणावर विशेष भर देऊन प्रश्न निकाली काढण्यात आले परंतु नजीक चिंचोली येथील मिनीनाथ घाडगे रस्त्याबद्दल योग्य तो निर्णय झाल्या नसल्याने पुन्हा त्यावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे असे तहसीलदार यांनी सांगितले तसेच माननिय तहसीलदार यांनी१४ जानेवारी 2025 रोजी गोंडेगाव म्हसले शिवरस्ता स्वतःउपस्थित राहून व भूमि अभिलेख उपधीक्षक गोसावी साहेब यांनी शिव रस्ता खुला केला त्याबद्दल चळवळीचे वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

भूमि अभिलेखचे कार्यालय अधीक्षक यांना संपर्क करुन श्री संदीप गोसावी उपअधीक्षक भुमिअभिलेख यांना न्याय दिनास उपस्थित केले. त्यांनी३४ शिव रस्त्यांचे मोजणीचे कार्यक्रम तयार केला व तसे आदेशही काढले व त्यातील चार ते पाच शिव रस्त्यांची मोजणी ही केली आता हद्दीच्या खुणा दाखविण्यासाठी तारखा निश्चित करीत आहेत असे त्यांनी सांगितले निंभारी अमळनेर शिवरस्ता मोजणी झाली नाही त्याबद्दल सुद्धा नवीन तारीख देण्याचे मान्य केले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे यांनी शेत रस्ता व शिव रस्ता समस्या सोडविण्यासाठी चा जनन्याय दिनाचा बोर्ड- फलक तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबांच्या परवानगीने लावला तहसीलदारने पुन्हा फलक जन न्याय दिनाचे गुरुवारी लावण्याची मान्य केले.

पुढील जनन्याय दिनाचे वेळी मागील कामाची प्रकरणाची कार्यवाही केल्याचा आढावा घेण्यात यावा तसेच शेत रस्ता ग्राम समिती प्रत्येक गावामध्ये स्थापन झालेली नाही त्या संदर्भात पुन्हा स्मरणपत्रे देऊन तलाठी व ग्रामसेवक यांनी शेत रस्ता स्थापन लवकर कराव्यात व त्याचा अहवाल घेण्यात यावा असे सुचविले गट विकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांनी शेत रस्ता समित्या स्थापनेबाबत जीआरच्या तरतुदीनुसार तहसीलदारांचे आदेश राबविण्यात असमर्थता दाखविली असताना तहसीलदारांनी गट विकास अधिकारी यांना फोन करून व गट विकास अधिकारी यांच्याकडून गाव रस्ते समिती स्थापन करून घेतो असे आश्वासन दिले व जलद गतीने शेत रस्ता समस्या सोडविण्यात याव्यात असे सुचविले.

जनन्याय दिनाचे वेळी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरद राव पवळे यांचाही फोन श्री नाथाभाऊ भाऊ शिंदे यांनाआला असता त्यांनी लागलीच तहसीलदार संजय बिरादार यांच्याकडे फोन देऊन श्री शरदराव पवळे यांनी तहसीलदार यांच्याशी शेत रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी नेवासा अग्रेसर आहे अशी शिफारस जिल्हाधिकारी सालीमठ साहेब यांच्याकडे केली आहे त्यामुळे नेवासा हा झिरो पेंडिंग केसेस झाल्या पाहिजेत असा प्रयत्न करण्यात यावा असे सुचविले
यावेळी तालुक्यातील शिव – पाणंद रस्ता चळवळीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे , सागर सोनटक्के , कृष्णा घोडेचोर त्र्यंबक भदगले श्रीपत दारुंटे, सुनील पाठक,शिवाजी काळे,राजू गरड, मुरलीधर जरे, रमेश भक्त,, कुशिनाथ फुलसौंदर , अविनाश मेहर बाबा,बाळू थोरात , सुजित तुवर,विठ्ठल करमड , मिनिनाथ घाडगे , काशिराम धाडगे , हाफिज खान पठाण सगाजी आयनर, बबन शिंदे, संतोष शिंदे,सोमनाथ शिंदे ,संभाजी पवार .गणेश बोचरे सोमाभाऊ माकोणे व पवार व त्यांचे गावकरी आदिंसह सुमारे ४० हुन अधिक शेतकरी उपस्थित होते. आता येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या गुरुवारी 6 फेब्रुवारी 2025 रोजी शेत रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.