सुनिताताई गडाख यांचे प्रतिपादन. मा सभापती भाऊसाहेब पटारे यांच्या ‘मागे वळून पाहताना’ आत्मचरित्राचे प्रकाशन
सोनई – राजकीय वाटचालीत अनेक यश अपयश पाहीलेले असतांनाही उत्तम संघटन आणि कौशल्याच्या जोरावर एक आदर्श निर्माण करुन समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेले नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब पटारे यांचे सहकार तसेच पंचायत राज व्यवस्थेतील कार्य तरुण पिढीला दिशादर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनिताताई गडाख यांनी केले. श्री. गणेश निकम लिखित पटारे यांच्या “मागे वळून पाहताना” या आत्मचरित्रचा प्रकाशन सोहळा त्रिमूर्ती शिक्षण संकुलात राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.

याप्रसंगी बोलतांना माजी सभापती सौ सुनीताताई गडाख पुढे म्हणाल्या की, जुनी जाणती माणसे ही समाजाला दिशादर्शक आहेत त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालूनच समाजाची प्रगती होते. भाऊसाहेब पटारे यांचे कार्य मार्गदर्शक असून त्यांच्या जीवनावर आधारित “मागे वळून पाहताना” हे आत्मचरित्र तरुणांना प्रेरणादायी आहे. सहकार, पंचायतराज मध्ये पटारे यांनी भरीव काम केलेले आहे. खा. यशवंतरावजी गडाख , खा. बाळासाहेब विखे , आ. आप्पासाहेब राजळे यांच्याबरोबर पटारे यांनी काम केल्याचे सौ. गडाख यांनी नमूद करून जिल्ह्याच्या राजकारणाची खडा ना खडा माहिती ठेवून नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.

यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पटारे, आत्मचरित्राचे लेखक गणेश निकम तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने सौ. मा सभापती सौ सुनीताताई गडाख, संजयबाबा गायकवाड, किशोर भणगे यांनी सत्कार केला.
याप्रसंगी श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे ह.भ.प.भास्करगिरी महाराज ,सुनीलगिरी महाराज,आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार डॉ.नरेंद्र पाटील घुले, साहेबराव घाडगे, सुमतीताई घाडगे, मा सभापती रावसाहेब कांगुणे, प्रभाकर शिंदे, गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, कुंडलिकराव माने, माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रा.शिरिष लांडगे, मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, नितीन दिनकर, प्रसिद्ध गितकार बाबासाहेब सौदागर, चंद्रकांत ढवळपुरीकर तमाशा मंडळाचे वगसम्राट मास्टर किरणकुमार ढवळपुरीकर, नाशिक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश मिसाळ, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, महंत अवेराज महाराज आराध्य, ऋषिनाथ महाराज सत्कारमुर्ती भाऊसाहेब पटारे, लेखक गणेश निकम, रावसाहेब पटारे, जनार्धन पटारे, ज्ञानेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड.देसाई आबा देशमुख, राजू पटारे, संदिप पटारे, बाबा पटारे, यांच्यासह सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक ,कृषी क्षेत्रातील ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिषेक पटारे यांनी शेवटी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.