नेवासा – अयोध्या येथील राम मंदिराच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे १००१ किलो रांगोळीतून राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. रांगोळी कलाकार बिडकीन येथील सचिन महाराज पडुळे व सावखेडा येथील आकाश महाराज केथा यांनी आपल्या कलेतून ही सुंदर रांगोळी साकारली असून ही रांगोळी पहाण्यासाठी दिवसभर येथे भाविकांनी गर्दी केली होती. चितेगाव येथील निलेश कैलास पाटील राजपुरे यांनी ७५ बाय १५० या आकारात साकारण्यात आलेल्या १००१ किलो रांगोळीसाठी योगदान दिले होते.

रांगोळी साकारण्यासाठी सुमारे दहा सहकाऱ्यांनी सहकार्य केले,ही रांगोळी काढण्यासाठी ४८ तास लागले असल्याचे रांगोळी कलाकार सचिन महाराज पडूळे यांनी सांगितले. देवगड गुरुदेव दत्त पिठाचे महंत राष्ट्र संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी या कलाकृतीचे कौतुक करून रांगोळी कलाकार सचिन महाराज पडूळे व आकाश महाराज केथा यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. “सियावर रामचंद्र की जय”जय श्रीराम.. जय जय.. श्रीराम असा जयघोष यावेळी हातवर करून यावेळी करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.