नेवासा – नेवासा येथे “राम सियाराम,…सियाराम ..जय जय राम” नामघोष करत प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील मंदिराचा श्री रामलल्ला मुर्तीच्या च्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा वर्धापन दिन श्री. संत ज्ञानेश्वर पैस खांब मंदिरात साजरा करण्यात आला यावेळी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांनी केले. यावेळी बाबाजी म्हणाले की राम मंदिर ज्या प्रमाणे निर्माण झाले तो दिवस नेहमी दीपावली सारखा देशातील लोकांनी साजरा करावा प्रत्येक घरी दीपप्रज्वलन करून प्रभू श्रीराम यांची उपासना व पूजा करून गोडधोड जेवण करून प्रभू श्रीराम यांना प्रसाद दाखवून आपण देखील तो प्रसाद घ्यावा ज्या ज्याप्रमाणे लक्ष्मीपूजन होते त्याचप्रमाणे प्रभु श्रीरामचंद्र यांचे पूजन केले जावे व सर्वांनी चांगल्या विचारांनी आपले जीवन जगावे येणारे काळात राम युग कसे आणता येईल त्याप्रमाणे सर्वांनी प्रयत्न करावा . यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष भाविक उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.