नेवासा – दिनांक 05/12/2023 रोजी खबर देणार भाऊसाहेब गोपीनाथ थोरे रा. खैरिनिमगाव ता. श्रीरामपुर यांनी श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे येथे हजर होऊन खबर दाखल कि त्यांचा मुलगा बळीराम भाऊसाहेब थोरे वय 36 वर्षे रा. खैरिनिमगाव ता. श्रीरामपुर हा दि.19/10/2023 रोजी घोडेगांव ता. नेवासा येथे सासुरवाडीला जावुन येतो असे सांगुन घरातुन निघुन गेला आहे. सदर व्यक्ती हा घोडेगाव येथे न जाता तो कोठे तरी निघुन गेला आहे. अशी खबर दिले वरुन श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे येथे मिसींग रजि नंबर 77/2023 प्रमाणे दाखल करणेत आली आहे. मिसिंग व्यक्तीचे वर्णन खालील प्रमाणे आहे.

नाव :- बळीराम भाऊसाहेब थोरे वय 36 वर्षे शरीरयष्ठी सडपातळ उंची: 5 फुट 5 इंच केस:- काळे
नाक :- सरळ कपाळ :- उंच कपडे पिवळसर पांढरा शर्ट, काळया रंगाची फुल पॅन्ट, पायात सॅन्डल
असा वरील वर्णनाचा इसम श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे हददीतुन मिसींग झाला आहे. तरी सदर मिसींग व्यक्ती कुठे आढळुन आल्यास तपासी अंमलदार पोहेकॉ / लवांडे राजेंद्र मो.नं 9527350223 किंवा श्रीरामपुर ता.पो.स्टे फोन नंबर 02422/222333 या नंबरवर कळविणेस विनंती आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.