नेवासा – वरखेड येथे कृषि महाविद्यालय सोनईच्या कृषिदुतांचे ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकरी चर्चासत्र पार पडले.कार्यक्रमाची सुरवात कृषिदुत गुणनिधी चव्हाण यांनी सर्वांच्या स्वागताने केली.प्रगतशील शेतकरी नितीन ढोकणे यांच्या कांद्याच्या शेतावर पार पडलेल्या या चर्चासत्रात कांदा पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन, पीक उत्पादन, खत व्यवस्थापन, सेंद्रिय शेती आणि जैविक खतांचा वापर या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

डॉ. अतुल दरंदले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. प्रमुख तज्ञ प्रा. नरेंद्र दहातोंडे (कीटक शास्त्र विभाग) यांनी कांदा पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण आणि खत व्यवस्थापन, कमीत कमी खर्चात कीड नियंत्रण कसे करावे, फवारणी करताना घ्यावयाची काळजी,तसेच प्रा. श्रीकृष्ण हुरुळे ( वनस्पती रोगशास्त्र विभाग) यांनी रोग नियंत्रण आणि जैविक खतांचे फायदे व त्याचा वापर, बीजप्रक्रिया, शेण खतातील गुणवत्ता वाढवणे,कंद अळी यावर मार्गदर्शन केले. उपप्राचार्य सुनिल बोरुडे यांनी माती परिक्षणाचे महत्त्व व मातीचे आरोग्य, प्राथमिक आणि दुय्यम अन्न द्रव्याचे फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

केळी उत्पादन संघटनेचे अहील्यानागर जिल्हा अध्यक्ष पुरूषोत्तम सर्जे यांनी केळी पिकावर मार्गदर्शन व सेंद्रिय शेती यावर भर दिला. कृषिमंडल अधिकारी सुहास धस व लक्ष्मण सुडके यांनी खत व्यवस्थापन मध्ये वापरली जाणारी ॲप्स व सरकारी योजना बद्दल माहिती दिली.या दरम्यान शेतकऱ्याकडून विविध प्रश्न विचारण्यात आले आणि तज्ञांकडून त्या प्रश्नाचे उत्तरे देखील देण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. हरी मोरे सर, उपप्राचार्य सुनिल बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले, प्रा श्रीकृष्ण हुरुळे प्रा.नरेन्द्र दहातोंडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल गोंधळी, कार्यक्रम अधिकारी प्रा. जयसिंग वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.

चर्चासत्राला उपस्थित मा. सरपंच विनोद ढोकणे, उपसरपंच विलास उंदरे, कृषिमंडल अधिकारी मा.सुहास धस साहेब व लक्ष्मण सुडके साहेब, केळी उत्पादन संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष मा. पुरुषोततम सर्जे, चेअरमन मा. कडूबाळ गोरे, प्रगतशील शेतकरी श्री नितीन ढोकणे, श्री संभाजी आगळे, श्री अमोल आगळे, श्री विकी ढोकणे,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता कृषिदूत गुणनिधी चव्हाण,शिवाजी तांदळे, ओंकार वाबळे,चेतन ननावरे,अपसुंदे तेजस,भालके प्रशांत यांच्या समन्वयाने झाली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.