नेवासा – षट्तिला एकादशीच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये मंगळवारी हजारो भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले.
पहाटेच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे देविदास महाराज म्हस्के यांच्या उपस्थितीत रावसाहेब पेचे, आशाबाई रावसाहेब पेचे यांच्याहस्ते महापूजा करण्यात येऊन पैस खांबास अभिषेक करण्यात आला. यावेळी विश्वस्त कैलास जाधव, रामभाऊ जगताप, भैय्या कावरे, शिवाजी होन यांच्यासह भाविक उपस्थित होते. देवगाव येथील सेवेकऱ्यांनी दिवसभर सेवा दिली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने गजानन महाराज संस्थान येथे सुरू असलेल्या सेवा उपक्रमाच्या माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर संस्थानमध्ये हा उपक्रम सुरू केला आहे. खुपटी ग्रामस्थांनी संत ज्ञानेश्वर मंदिर परिसर, सभागृह, उद्यान, गोशाळा, ध्याने भवन येथे. दिवसभर स्वच्छता मोहीम राबवली.
महिन्याच्या प्रत्येक एकादशी अगोदर येऊन मंदिर परिसर स्वच्छ करण्याचा संकल्पही केला आहे. या निःस्वार्थ सेवेबद्दल मंदिर समितीच्यावतीने देविदास महाराज म्हस्के यांच्याहस्ते खुपटी ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.