नेवासा – अहिल्यानगर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची लेखी परीक्षा मंगळवारपासून (दि.११) सुरू होत असून दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून परीक्षेसाठी जिल्ह्यात १०९ केंद्र असून ६३ हजार ६५८ विद्यार्थी आहेत. परीक्षा केंद्रावरील सरसकट शिक्षक, शिक्षकेतर आणि परिचर यांच्या -आदला-बदल करण्यास शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर आता गेल्या पाच वर्षात परीक्षेत गैरप्रकार झालेल्या केंद्रांवरील पर्यवेक्षण यंत्रणेत बदल करण्यात आला दरम्यान परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला परीक्षेचा बैठक क्रमांक कोठे आहे हे माहिती नसते. त्याठिकाणी परीक्षा हॉलमध्ये जाताना अंगझडती घेतली जाते. त्यामुळे अर्धा तास अगोदर केंद्रावर पोहचावे, असे आवाहन परीक्षा बोर्डाच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात ११ फेब्रुवारी ते १८ मार्च यादरम्यान बारावीची तर २१ फेब्रुवारी-ते १७ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.