ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भाजप

नेवासा – नेवासा तालुक्यातील चिंचबन मधील ऍड भारत विनायक चव्हाण,संभाजी विनायक चव्हाण,गोरक्षनाथ विनायक चव्हाण यांनी तालुक्यातील स्थानिक भाजप नेतृत्वाला कंटाळून आ शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे. ॲड भारत चव्हाण व त्यांचे कुटुंबीय चिंचबन व परिसरातील गेल्या 30 वर्षांपासून भाजपाचे एकनिष्ठ काम करून पक्ष वाढीसाठी काम करत होते.

त्यांचे वडील विनायक चव्हाण यांनीही तालुक्यात पक्ष वाढीसाठी काम केले होते. परंतु नेवासा तालुक्यात स्थानिक भाजप नेतृत्व हे पक्ष वाढीपेक्षा स्वतःच्या विकासातच दंग झालेले आहे, यामुळे तालुक्याच्या विकासासाठी काम करणारे आ शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे ॲड भारत चव्हाण यांनी सांगितले. भारत चव्हाण यांच्या पत्नी सौ सुनीता चव्हाण या चिंचबन ग्रामपंचायतच्या विदयमान सदस्या आहेत.

चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपला चिंचबन परिसरात जोरदार झटका बसला आहे. याप्रसंगी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य अरुण शिंदे,ॲड संदीप चव्हाण, सुरेश चव्हाण,भाऊसाहेब मापारी,नंदू चव्हाण आदींसह चिंचबन व परिसरातील ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप
भाजप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाजप
भाजप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाजप


Share the Post:
error: Content is protected !!