ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जय हरी आश्रम नेवासा येथे सभामंडपाचे लोकार्पण.

शंकरराव गडाख

नेवासा – जय हरी अध्यात्मिक प्रतिष्ठान नेवासा येथे संत सच्चीदानंद श्रीपादबाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त
ह भ प कडूबाळ महाराज काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सप्ताह प्रसंगी आ शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातुन जय हरी आश्रम नेवासा येथे पूर्णत्वास आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण व धर्मध्वजारोहन आ शंकरराव गडाख,ह भ प कडूबाळ महाराज काटे,ह भ प रमेशानंदगिरी महाराज त्रिवेणीश्वर देवस्थान यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अमरनाथ काटे यांनी केले. आ शंकरराव गडाख यांनी विशेष निधी दिल्याने जय हरी आश्रमाचा सभामंडप पूर्ण झाला आहे व याचा भाविकांना व आश्रमास फायदा होते असे डॉ काटे म्हणाले.

याप्रसंगी बोलतांना महंत रमेशानंदगिरी महाराज म्हणाले, आ गडाख हे न मागता मदत करणारे नेते आहेत.
नेवासा तालुक्यातील विविध धार्मिक ठिकाणांना निधी दिल्याने मंदिर परिसराचा कायापालट झालेला आहे अनेक मंदिरात दिमाखात सभामंडप उभे राहिले आहेत. कथा,कीर्तन ,सप्ताह यशस्वी करण्यासाठी आ शंकरराव गडाख नेहमी आवर्जून सहकार्य करतात व जय हरी आश्रमात उभा राहिलेला सभामंडप भाविकांना उपयोगी येणार असल्याचे महंत रमेशानंदगिरी महाराज म्हणाले.

याप्रसंगी बोलताना आ शंकरराव गडाख म्हणाले, माझे बंधू प्रशांत गडाख यांनी जय हरी आश्रमास सभामंडप देण्याचा शब्द दिला होता तो शब्द मला पूर्ण करता आला याचा अभिमान आहे. सभामंडप पूर्ण करतांना अनेक अडचणी आल्या परंतु परमेश्वर कृपेने महाराज व भक्तांच्या आशीर्वादाने सभा मंडप पूर्ण झाला. सभामंडपाचा उपयोग आश्रमात येणाऱ्या भाविकांना व होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपयोगी येणार आहे. यापुढेही नेहमी आश्रमाला सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू म्हणाले व उपस्थित भाविकांनी सप्ताह यशस्वी केल्याबदल सर्वांचे स्वागत केले. ह भ प कडूबाळ महाराज काटे म्हणाले आ शंकरराव गडाख हे कमी बोलतात परंतु दिलेला शब्द प्रामाणिकपणे पूर्ण करून प्रश्न मार्गी लावतात.

प्रशांत गडाख यांनी जय हरी आश्रमास सभामंडप देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द सर्वोतपरी प्रयत्न करून
आ गडाख यांनी मार्गी लावला. सभा मंडपाचे काम गुणवत्तापूर्ण पध्दतीने पूर्ण केले. यापूर्वी अनेकांनी कामे करण्याचे शब्द दिले परंतु काम पूर्ण करून दाखवण्याची धमक फक्त आ शंकरराव गडाख यांच्यामध्येच आहे असे ते म्हणाले.
विकासाबरोबरच धर्माच्या कार्यात आ गडाख हे पुढाकार घेऊन कार्य करणारे नेतृत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
धार्मिक कार्यात निर्मळपणे पुढाकार घेणाऱ्या नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी समाज नेहमी पाठीशी राहतो.
आ शंकरराव गडाख हे धर्म कार्याला पाठबळ देणार नेतृत्व असल्याचे ह भ प कडूबाळ काटे महाराज म्हणाले.
ह भ प मंगल काटे,मा सरपंच योगेश म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी ह भ प वसंत महाराज गडकर कराड, महंत आवेराज महाराज,मा सभापती जनाभाऊ शेळके,सरपंच अझर शेख,सुनील नजन,बबन तांबे,दादासाहेब कोकणे, गळनिंबचे उपसरपंच विजय घावटे,रमेश बहिरट,बाळासाहेब वाघ,भैय्या कावरे,प्रतिभा काटे,प्रियंका काटे आदींसह नगर जिल्हा व संभाजीनगर मधील भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन बाबासाहेब दहातोंडे यांनी केले. आभार अशोक दामले यांनी मानले.

धर्म कार्यात आ शंकरराव गडाख यांचा नेहमी पुढाकार असतो तालुक्यातील अनेक गावामधील मंदिरामध्ये त्यांनी विविध विकासकामे करून धार्मिक क्षेत्रात बळकटी आणण्याचे काम केले आहे असे ह भ प कडूबाळ महाराज काटे म्हणताच उपस्थित भावीकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव गडाख
Share the Post:
error: Content is protected !!