ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

झाडे

नेवासा – तालुक्यातील सलाबतपुर गेवराई पाट्यावरील रोड वरती दुतर्फा झाडाची बातमी काही दिवसापूर्वी आम्ही नेवासकर न्यूजने प्रसारित केली होती. त्याच बातमीची दखल घेत वन विभागाने तसेच पाटबंधारे विभागाने त्वरित पाऊले उचलत पाटावरील दुतर्फा फार वाढलेले झाडे काढून टाकली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तसेच शाळकरी मुलांना ये-जा करण्यासाठी तसेच अपघाताला सामोरे जावे लागत होते.

परंतु आम्ही नेवासकर न्यूजने दखल घेतली बातमी प्रसारित करताच वन विभाग तसेच पाटबंधारे विभाग खडबडून जागे झाले व दुतर्फा रोड वरील झाडाचे छाटणी केली. त्यामुळे सलाबतपुर तसेच गेवराई परिसरातील नागरिकांच्या वतीने आम्ही नेवासकर न्यूजचे अभिनंदन व आभार व्यक्त केले जात आहे.

अशाच प्रकारच्या या मागेही आम्ही नेवासकर व न्यूजने सलाबतपुर -शिरसगाव रोडवरील पुलावरील खड्ड्याची बातमी प्रसारित केली होती त्या बातमीची दखल घेत बांधकाम विभागाने लवकरात लवकर दखल घेऊन तो खड्डा आता पूर्णतः बुजवला त्यानंतर पाटावरील दुतर्फा झाडाची बातमी प्रसारीत केली त्याच बातमीची दखल घेत वनविभाग तसेच पाटबंधारे विभाग खडबडून जागे झाले व दुतर्फ वाढलेली झाडे पूर्णतः छाटली गेली व नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आला त्यामुळे आम्ही नेवासकर न्यूजचे सर्व स्तरातून सलाबतपुर- गेवराई परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

झाडे
झाडे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

झाडे
झाडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

झाडे
Share the Post:
error: Content is protected !!