ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नगरपंचायत
नगरपंचायत

नेवासा – नगरपंचायत येथील अकाऊंट विभाग येथे मोठे व्यवहार होत असल्याने व परिणामी तेथील अधिकारी यांचे जीवास धोका असल्याने सीसीटिव्ही बसवण्यात यावे अशी मागणी नेवासकर तरुणांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत येथे मोठे आर्थिक व्यवहार होत असतात. त्यासाठी अनेक अज्ञात ज्ञात व्यक्ती लेखापाल विभागात जमा होत असतात.  त्यामुळे लेखापाल यांना कामावर दबाव येऊ शकतो व जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

नेवासकर नागरिकांना यामुळे त्यांचे कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विकासकामात तडजोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही समस्त नेवासकर विनंती करतो की,  सदर लेखापाल विभागाला एक कायमस्वरूपी सीसीटिव्ही बसवावा (जे स्टेट व सेंट्रल बँकांमध्ये असते) याचा विचार होऊन त्वरित कार्यवाही व्हावी.

नगरपंचायत

सदर निवेदन उमेश ठाणगे यांनी वाचून दाखवले व याबाबत माहिती दिली. ती अशी की,  नगरपंचायत येथे मोठे मोठे कंत्राट मंजूर होत असतात व आर्थिक व्यवहार मोठे मोठे होतात, अश्यातच लेखापाल विभागात ज्ञात, अज्ञात व्यक्तींची संख्या वाढत असल्याने व नेवासा हा विकसनशील गाव होत असल्याने अनेक कामांमध्ये तडजोड केली जात असल्याचे दिसून येऊ लागले आहे, हा कोणत्या कॉन्ट्रॅक्टर चां दबाव आहे की कोणती देवाण घेवाण होते? यासाठी सीसीटिव्ही गरजेचा असल्याचे नमूद केले दिलेल्या निवेदनावर नेवासकर तरुणांच्या सह्या आहेत.

नगरपंचायत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नगरपंचायत
नगरपंचायत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नगरपंचायत
Share the Post:
error: Content is protected !!