ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

स्वर माधुरी

नेवासा – नेवासा येथील स्वर माधुरी ग्रुपच्या वतीने श्रीराम मंदिरात आयोजित “आज अयोध्या सजली” या रामगीतांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गायिका सौ.माधुरी कुलकर्णी गायलेल्या प्रभू रामचंद्रांच्या भक्ती गीतांना उपस्थित महिलांनी टाळयांच्या गजरात दाद दिली.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गायिका सौ.माधुरी कुलकर्णी यांना ग्रुपच्या सदस्या अनिता गुजराती,संगीता शिंदे,शीतल जोशी,माया गुजराती,सुरेखा गुजराती, सौ. साधनाताई मुळे,खुशबू जगताप,मेघा करवंदे,रुपाली रासने,सुचिता परदेशी,कोमल जगताप,छाया गुजराती, दीपाली गुजराती,शोभा बेन यांनी भक्ती गीत गायनाला उत्कृष्ट साथ दिली यासाठी हनुमान भजनी मंडळाचे हार्मोनियम वादक ज्ञानेश्वर काळे व तबला वादक सुनील शिंदे यांनी संगीत साथ देऊन कार्यक्रमाला बहर आणला.

यावेळी श्रीराम मंदिराच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप,विजय गांधी,पत्रकार अशोक डहाळे, श्रीराम मंदिराचे सेवेकरी अंकुश लवडकर,कार्यक्रम संयोजक नितीन कुलकर्णी यांनी स्वर माधुरी ग्रुपच्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यक्रमात रंगत आणून वातावरण राममय केल्याबद्दल धन्यवाद देत श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान केला. गायिका सौ.माधुरी कुलकर्णी यांनी गायलेल्या रामतांडव समूह गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

स्वर माधुरी
स्वर माधुरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्वर माधुरी
स्वर माधुरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्वर माधुरी
Share the Post:
error: Content is protected !!