ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राम

नेवासा फाटा – नेवासा फाटा येथील मुळा पाटबंधारे वसाहतीमध्ये प्रशस्त असलेल्या हनुमान मंदिरामध्ये ,अयोध्येमध्ये होत असलेला प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व त्यानिमित्ताने देशभर हिंदूंच्या मंदिरामध्ये व घरोघरी विविध कार्यक्रमाने दिवाळी साजरी होत असताना नेवासा फाटा परिसरातील सर्व राम भक्तांनी एकत्र येऊन आज सोहळा आयोजित केला होता.

हनुमान मंदिरा परिसर सकाळपासूनच सडा रांगोळी काढून सजविले. सर्वत्र लाईटच्या माळा लावून पताका लावण्यात लउन, दीपोत्सव करण्यात आला.बारा वाजता सर्वांनी एकत्र येऊन प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेस पूजन केले व हनुमान रायाच्या मूर्तीचे पूजन केले आणि तसेच हनुमान चालीसा,राम रक्षा स्तोत्र पठण केले. भक्तिमय वातावरणामध्ये दुपारचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

सायंकाळी सहा वाजता पुन्हा दीपोत्सव भजन पठण करून 3000 लोकांना महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले.
यावेळी मुकीदपूरचे सरपंच सतीश निपुंगे, बाळासाहेब देवखिळे आणि हनुमान मंदिर कमिटी व्यवस्थापन यांनी अतिशय चोख नियोजन ठेवले होते.

राम
राम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राम
राम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राम
Share the Post:
error: Content is protected !!