ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मुक्ताई

नेवासा तालुक्‍यातील मुक्ताई महिला मंचचा अभिनव उपक्रम.

नेवासा – येथील पावन गणपती जवळ असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालयात महिला बचत गटांसह महिला उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने नेवासातील मुक्‍ताई महिला मंचच्या पुढाकाराने दि. 25, 26, 27, 28  जानेवारी 2024 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत मुक्ताई जत्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन यंदा जत्रेचे दुसरे वर्ष असल्याची माहिती मुक्‍ताई महिला मंचच्या वतीने देण्यात आली.

उपक्रम महिला सक्षमीकरणाचा… आनंदोत्सव नेवासकरांचा हे उत्सवाचे ब्रीद असून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच सांस्कृतिक परंपरांच जतन व्हावं हा मुक्ताई जत्रा उपक्रमाचा मुळ उद्देश या उपक्रम आहे.  महाराष्ट्राची कलासंस्कृती ग्रामीण खाद्य महोत्सव यासह ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, मसाले पदार्थ, लोणची, कपडे, फळे, पालेभाज्या, धान्य, कडधान्य, भेटवस्तू, शोचे वस्तू, घरगुती दैंनदिन वापराच्या वस्तू इत्यादी उत्पादने विक्रीस उपलब्ध असतील. तालुक्यातील महिला बचत गट व उद्योजिक व्यावसायिक यांना 60 स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

मुक्ताई

मुक्‍ताई जत्रेत यंदा दि. 26 जानेवारी रोजी सायं. 6 वाजता शहरातील ज्ञान फाऊंडेशनच्या सहकार्याने सुप्रसिद्ध ‘दिल है हिंदुस्थानी’ एक शाम वतन के नाम हा देशभक्‍तीपर गीतांचा रंगारंग मनोरंजनात्‍मक कार्यक्रम घेत असुन तसेच दि. 28 जानेवारी रोजी सायं. 6 वाजता मा.आमदार शंकरराव गडाख पाटील मित्र मंडळ, नेवासा यांच्या सहकार्याने सिनेमा फेम सुप्रसिद्ध निवेदक निलेश पापत यांचा अस्सल विनोदी कार्यक्रम ‘हा खेळ पैठणीचा’ अर्थात नवे होम मिनीस्टर हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजन केलेला असुन यात खेळ, गप्पा, गोष्टी, गाणी, विनोद, नकला या धमाल गोष्टी सह रंगदार पैठणीचा लाजवाब कार्यक्रम घेत असुन महिलांसाठी ही विशेष पर्वणी ठरणार आहे.  यासाठी परिसरातील सर्वांनी या कार्यक्रमास  तसेच शॉपिंग फेस्टीवला उपस्थित राहावे हे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

मुक्ताई जत्रा मध्ये विविध स्टॉल थाटण्यात येणार असून त्याची बुकिंग सद्या सुरू आहे. शॉपिंग बरोबरच मनोरंजन, फूड स्टॉल असा त्रिवेणीसंगम येथे पहावयास मिळणार आहे, ज्या बचत गटांना या मुक्ताई जत्रा उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८२२३१००३० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन मुक्‍ताई महिला मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

newasa news online
मुक्ताई

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मुक्ताई
मुक्ताई

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मुक्ताई
Share the Post:
error: Content is protected !!