ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अयोध्या

नेवासा – 22 जानेवारी रोजी झालेल्या राम लला मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथे देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांना आमंत्रित केले गेले होते. त्याच अनुषंगाने आज ते रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर देवगड देवस्थान येथे काल सायंकाळी परतले .देवगड देवस्थान येथे त्यांचे स्वागत देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी गुरुवर्य महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी केले .तसेच गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरोआई पेसोडे यांचे संत पूजन पुष्पहार व आरती गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी देवगड येथे येताच केली.

गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या स्वागताची तयारी देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली देवगड देवस्थान येथील बालगोपाल यांनी उत्कृष्ट प्रकारे केली होती.यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज बोलताना म्हणाले की गेल्या कालच्या 22 तारखेला प्रभू रामचंद्र भगवान आयोध्या येथे सिंहासनावरती अरुढ झाले असून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा स्थापनेचा कार्यक्रम हा अतिशय विलोभनीय याची देही याची डोळा याप्रमाणे संपन्न झाला.

तसेच हा कार्यक्रम पाहून मन ही तृप्त झाले तसेच दीडशे पंथावरून अनेक साधुसंत या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच अनेक व्ही.आय.पी मान्यवर तसेच परदेशी पाहुणेही या कार्यक्रमाला उपस्थित होते संपूर्ण अयोध्या ही पूर्णतः सजवली गेली होती प्रभू रामचंद्र बद्दलचे प्रेम हे सर्व सुशोभीकरणाच्या माध्यमातून आयोध्या येथे दिसत होते.संपूर्ण आयोध्या मध्ये कुठेही गेले तरी श्रीराम भगवंताच्या ध्वनी ऐकायला मिळत होत्या जन्मभूमी वरती जे मंदिर झालेले आहे ते आपल्या पाचशे वर्षांचा कलंक संपुष्टात आलेला असून कालचा हा मूर्ती स्थापनेचा आनंद हा दिवाळी दसऱ्यापेक्षाही उत्कृष्ट होता तसेच देशभरातील सर्वच मान्यवरांनी हा आनंद उपभोगला आहे.

तसेच भास्करगिरीजी महाराज पुढे बोलताना म्हणाले की जगाला राम भूमीच्या माध्यमातून सुसंस्कार मिळत राहतील भारतीय संस्कृती कशी श्रेष्ठ व थोर आहे हे जगाला यापुढे कळत राहील या संस्कृतीला दृढ करण्यासाठी युवा पिढीवरचे संस्कार करायचे असतात ते या पुढेही चांगल्या प्रकारे राम मंदिराच्या माध्यमातून घडवले जातील तसेच राम मंदिराच्या माध्यमातून अनेक धार्मिक संस्था तसेच विद्यालय तयार होणार आहे.आध्यात्मिक शिक्षणाचा पाया राम मंदिरामुळे मजबूत होईल इतर सर्व सामाजिक विचार करून या मंदिराची आखणी झालेली आहे. जे जे राम भक्त आयोध्याला जातील त्यांना आनंद देणारे हे राम मंदिर आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले कीराम भक्त अगोदर म्हणत होते राम लला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे आता असं म्हणावं वाटतं की राम लला हम आये हे मंदिर भव्य बनाया है राम मंदिर बनवण्यामध्ये सर्व राम भक्तांची ताकद आहे तसेच राजकीय इच्छाशक्ती आहे सर्व मिळून हा कार्यक्रम पार पडलेला आहे.हा कार्यक्रम कुठल्या जाती धर्माचा न ठेवता कुठल्याही पक्षाचा न ठेवता हा रामाचा कार्यक्रम आहे विश्वाचा कार्यक्रम आहे तसेच आम्ही 22 तारखेच्या कार्यक्रमातून अनुभवले आहे तसेच यापुढेही हा कार्यक्रम असाच चालू राहिलेला पाहावयास मिळणार आहे.

पुढे बोलताना गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले की झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पिके गाई ओडल्या म्हशी रामराज्य झाले याचा अर्थ सुखाचे राज्य झाले आपलं सुख इतरांना देत राहा इतरांचे दुःख घेत रहा प्रभू रामाने आपल्या सुखाचा दिनदुबळ्यांकरता त्याग केला जे पाऊल सिंहासनावर चढणार होते ते पावलं सुखामधुन काढून 14 वर्षे वनवास भोघण्यासाठी गेले.तसेच रावणासारखी दृष्ट शक्ती ही नष्ट करून खऱ्या अर्थाने राम राज्य निर्माण झालेले आहे. रामराज्य म्हणजे सदैव सदाचार समर्पण भावना, त्याग, हे सर्व आपल्याला रामराज्य शिकवते यावेळी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादाने हा बंधुभाव असा दृढ होत राहो जातीधर्मातील भेदभाव नष्ट करून एकच वसुधैव कुटुम्बकम: आम्ही सर्व एका कुटुंबातले व एका ईश्वराचे आहोत ही भावना प्रभू रामचंद्र भगवंताच्या मंदिरातून कथा कीर्तनातून इतर सामाजिक कार्य मधून आपल्याला हे चित्र उमटलेले दिसेल.

कालचा कार्यक्रम हा अतिशय वैभव संपन्न व सर्वांना सुख समाधान देणारा कार्यक्रम आहे. यावेळी त्यांनी सर्व रामभक्तांचे अभिनंदन केले व राम लला मूर्ती प्रतिष्ठा सोहळ्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रम प्रसंगी देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, संत सेवक बाळू महाराज कानडे, संदीप साबळे, तात्या महाराज शिंदे, शुभम महाराज बनकर, दत्ता महाराज शिंदे, आदेश महाराज राऊत, राहुल ठोंबरे, तसेच देवगड भक्त परिवारातील मंडळी मोठ्या संख्येने गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या स्वागतासाठी गुरुकुल येथे उपस्थित होते.

अयोध्या
अयोध्या

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अयोध्या
अयोध्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अयोध्या
Share the Post:
error: Content is protected !!