ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राष्ट्रीय

गणेशवाडी – राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या श्रमसंस्काराच्या माध्यमातुन व्यक्तीमत्व सुधारत असल्याचे काम करते.यामुळे विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे नेवाश्याचे नायब तहसिलदार किशोर सानप यांनी सांगितले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सोनई येथिल मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पानेगाव (ता. नेवासा) येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता प्रसंगी बोलत होते.

विद्यार्थ्यानी मोबाईल चा वापर अभ्यासासाठी, शासनाच्या विविध योजनेची माहिती घेण्यासाठी अशा
चांगल्या कामासाठी करावा. शालेय जिवनामधील विविध उपक्रमातुन व्यक्तीमत्व सुधारत असते. याचा उपयोग समाजासाठी,देशासाठी करण्याचे आवाहन नायब तहसिलदार किशोर सानप यांनी केले. राष्ट्र उभारण्यासाठी व स्वतःच्या विकासासाठी ध्येय ठेवुन श्रम करणे गरजेचे आहे.शिक्षक हे विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक आहे.समाजाला योग्य दिशा दाखविण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक
आशिष शेळके यांनी यावेळी केले.

स्वंतःहाचे चारित्र्य संभाळा,आई-वडील ,वडीलधा-यांचा सन्मान ठेवा,कष्ट करा तरच तुम्ही चांगल्या प्रकारे घडु शकता,असेही ते म्हणाले. १८जानेवारी ते २४जानेवारी या कालावधीत झालेल्या शिबीरात १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे,उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने,डॉ.संभाजी दराडे,माजी सरपंच संजय जंगले आदीनीं मार्गदर्शन केले. उपसरपंच दत्तात्रय घोलप, पोलिस पाटील बाबासाहेब जंगले,हितेश जंगले, सरपंच निकीता भोसले,,गणेश बेल्हेकर,धनाजी जाधव, प्रा.किरण आरगंळे,प्रा. महेश जंगले, आदीसह विद्यार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी जय दरदंले,चेतन कानडे, मनिषा थोरात, सुजाता कर्डिले यांचा उत्कृष्ट एन एन एस विद्यार्थी म्हणुन निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. बाळासाहेब खेडकर, सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर पादर यांनी केले तर
डॉ. सिध्दार्थ रणयेवले यांनी आभार मानले.

राष्ट्रीय
राष्ट्रीय

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राष्ट्रीय
राष्ट्रीय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राष्ट्रीय
Share the Post:
error: Content is protected !!