ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पाणी

बेलपिंपळगाव – भंडारदरा धरणाचा टेल चा भाग म्हणजे नेवासा तालुका आणि आज काल कोणत्याही शेतकऱ्याच्या घरातील पाळीव गाय, म्हैस, बैल, शेळी मृत झाले तर ते शेतकरी कुठं खडे घेऊन पुरत नाही तर भंडारदरा धरणातून येणाऱ्या पाट पाण्यात टाकतात हेच पाणी ग्रामीण भाग असो वा शहरी भाग यांना पिण्यासाठी जातं अनेक लोक या पाट पाण्यात अनेक अनावश्यक वस्तू टाकतात यातून पिण्याच्य पाणी तर खराब होतच तसेच पाटाला असणाऱ्या पोट चारी कचरा साचत असल्याने बंद होतात.

पाणी

शासन जल शुद्धीकरण वर लाखो रुपये खर्च करत असताना जाणूनबुजून काही लोक मृत जनावर पाटात आणून टाकतंय यातून अनेकांच्या जीवितास धोका होऊ शकतो तरी देखील जर असे जनावर मृत झाले तर जमिनीत खड्डा घेऊन त्यात पुरावे जेणेकरून हे पाणी शुद्ध व निर्मल राहील यासाठी पाटबंधारे विभाग व त्या त्या भागातील ग्रामपंचायत यांनी लक्ष द्यावे जेणे करून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल.

भंडारदरा धरणाच्या टेल च्या भागात आमचे गाव असून वरील भागातून मृत जनावर या पाटात टाकली जातात याची पाट बंधारे विभाग यांनी तातडीने दखल घेऊन या पुढ असं होणार नाही याची काळजी घेऊन आम्हाला शुद्ध पाट पाणी द्यावे जेणे करून आमचं आरोग्य चांगल राहील व रोग राई होणार नाही आणि जर असं पाणी आलं तर संबंधित लोकांवर कारवाई करावी. आपल्या बरोबर दुसऱ्याच देखील आरोग्य खराब होणार नाही या कड सर्व सुज्ञ नागरिक यांनी लक्ष द्यावे अशी मागणी गावातून होत आहे,
– श्री रमेश विश्वनाथ शिंदे, शेतकरी, बेलपिंपळगाव

पाणी
पाणी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाणी
पाणी
पाणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाणी
Share the Post:
error: Content is protected !!