ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मुक्ताई जत्रा

मुक्ताई जत्रा सारख्या उपक्रमामुळे महिलांना उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल – सौ.सुनीताताई गडाख

नेवासा – नेवासा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन नेवासा येथील मुक्‍ताई महिला मंचच्या वतीने आयोजित चार दिवशीय आयोजित “मुक्ताई जत्रा” चे उदघाटन पंचायत समितीच्या माजी सभापती  सौ. सुनीताताई शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.मुक्ताई जत्रा सारख्या उपक्रमामुळे महिलांना उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल असा विश्वास सौ.सुनीताताई गडाख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

नेवासा येथील पावन गणपती जवळ असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालयात सदरची मुक्ताई जत्रा भरली आहे यावेळी झालेल्या उदघाटन प्रसंगी प्रवेशद्वाराजवळ मांडण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.सुनीताताई गडाख,नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी “मुक्ताई जत्रा”च्या मार्गदर्शक सौ.शर्मिलाताई शिंदे यांनी यांनी मुक्ताई जत्रात सहभागी झालेल्या महिला महिला बचत गट व  महिला उद्योजिकांचे स्वागत करून सौ.गडाख यांचा सन्मान केला. प्रास्ताविक करतांना सौ.शिंदे म्हणाल्या की महिलांनी  उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने नेवासा येथील  मुक्‍ताई महिला मंचच्या पुढाकाराने दि.२५ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४  या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत “मुक्ताई जत्रा” उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सुमारे सत्तर स्टॉल लक्ष्मी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात थाटण्यात आले असल्याची  माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी बोलताना सौ.सुनीताताई गडाख म्हणाल्या की माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी नेहमी तालुक्यातील महिला बचत गटांच्या उत्कर्षासाठी काम केले आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी ही बचत गटाच्या महिला व उद्योजकांना प्रेरणा व पाठबळ देण्याचे काम करत आहे.मुक्ताई जत्रा उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच सांस्कृतिक परंपरांच जतन व्हावं हा मुक्ताई जत्रा उपक्रमाचा मुळ उद्देश या उपक्रमामुळे निश्चितच साध्य होईल,महिला ही मोठया उद्योजक व्हाव्यात म्हणून मुक्ताई जत्रा सारखा उपक्रम हा प्रेरणादायी असा असल्याचे गौरवोदगार त्यांनी यावेळी बोलताना काढले.

यावेळी सभापती नंदकुमार पाटील यांनी मुक्ताई जत्रा उत्सवाला आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या तर युवा उद्योजिका कु. साक्षी विखोना व श्रीमती सविता मुनोत यांनी आपले मनोगत व्यक्त करत मुक्ताई जत्रामुळे आमचा उत्साह वाढला असल्याचे सांगितले.सदर प्रसंगी सौ.सुनीताताई गडाख यांनी महिला उद्योजकांच्या लावलेल्या विविध स्टॉलची पहाणी करत त्यांच्याशी सुसंवाद साधत त्यांच्या स्टॉलचे व बनवलेल्या विविध खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत कौतुक केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रम गोगलगावच्या सरपंच सौ.शिल्पाताई मते,मुक्ताई महिला मंचच्या मार्गदर्शक सौ.शर्मिला शिंदे,सौ.अर्चना कुंभकर्ण, सौ.जयश्रीताई शिंदे,सौ.मनिषा पोतदार,सौ.कावेरी मापारी,नगरसेविका सौ.अंबिका ईरले,इंदोर येथील सौ. सुशिलाताई काटे,सौ.चंचल विखोना,सौ.रेखा देशमुख, अँड.प्रविण भासार, महेश मापारी,राजेंद्र मापारी,जितेंद्र कु-हे,दिनेश व्यवहारे, मुळाचे संचालक शिवा जंगले पाटील,जालिंदर गवळी,प्रा.देविदास साळुंके,मुळा जत्रा प्रेरक सागर गंधारे यांच्यासह महिला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.तर सौ.कावेरी मापारी यांनी उपस्थित महिला उद्योजक व मान्यवरांचे आभार मानले.,

मुक्ताई जत्रा
मुक्ताई जत्रा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मुक्ताई जत्रा
मुक्ताई जत्रा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मुक्ताई जत्रा
Share the Post:
error: Content is protected !!