ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ज्ञानेश्वर

नेवासा – ज्ञानेश्वरीचे रचना स्थान असणारे तीर्थक्षेत्र मागे राहिल्याचे शल्य असून त्यास सर्वजण जबाबदार आहोत मात्र देशाच्या नकाशावर हे तीर्थक्षेत्र यावे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र करण्यासाठी चांगला आराखडा तयार करावा असे आदेश महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिरात ज्ञानेश्वर सृष्टी साठी घेतलेल्या तीर्थक्षेत्र विकास बैठकीत नामदार विखे यांनी या हे आदेश दिले.
ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी देवस्थानच्या वतीने तयार केलेल्या विकास आराखड्यातील योजना विशद केल्या तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शासनास पूर्वी सादर केलेल्या विकास आराखडा ही यावेळी विखे यांना देण्यात आला.

सर्व विकास आराखडांचा एकत्रित विचार करून नवीन सूचनाचे स्वागत करून यामध्ये समावेश करावा व चांगला विकास आराखडा तयार करावा असे आदेश यावेळी देण्यात आले नामदार विखे पुढे म्हणाले की, विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरीचे रचना स्थानाचा हवा तसा विकास झाला नाही, त्यासाठी सर्वजण जबाबदार असून यापुढे सिमेंट इमारतीचे जंगल उभे न करता नैसर्गिक दिसणाऱ्या सर्व गोष्टींचा या नवीन विकास आराखड्यात समावेश करावा. जवळ असणाऱ्या शासकीय जमिनीसह इतर जमिनी अधिग्रहित करा.

नगर संभाजीनगर राजमार्गावरून नेवासा येथे येणारे रस्ते चार पदरी झाले पाहिजे असाही त्यात समावेश असावा
भाविकांना सर्व सुख सोयी उपलब्ध होतील असा या गोष्टीचा समावेश करताना ज्ञानेश्वरांच्या पैस खांबाच्या मंदिरासह मोहिनीराज मंदिरात परिसराचाही या विकास आराखड्यात समावेश केला पाहिजे जगातून लोकांनी ज्ञानेश्वरीचे अभ्यास करण्यासाठी यावे असे आध्यात्मिक केंद्राची उभारणी येथे झाली पाहिजे जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर केलेल्या निधीतून शिवसृष्टीचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना यावेळी देण्यात आले.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे,नितीन दिनकर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर ,प्रांताधिकारी सुधीर पाटील, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

newasa news online
ज्ञानेश्वर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वर
Share the Post:
error: Content is protected !!