ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

प्रजासत्ताक दिन

नेवासा फाटा – कृषी महाविद्यालय सोनई येथील कृषी दुतांनी झाडांचे महत्त्व सांगत व वृक्षदिंडी काढून जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी ध्वजारोहण माननीय सरपंच मीनाताई जोजार यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच जीवनराव वंजारे व प्रमुख पाहुणे माजी उपसभापती किशोर भाऊ जोजार हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनंदा ईधाटे यांनी केले अध्यक्ष सूचना महेश देवतरसे व अनुमोदन संदीप खेसे यांनी केले. सूत्रसंचालन रंगनाथ गुंजाळ यांनी केले.

कृषी महाविद्यालय सोनई येथील प्राचार्य डॉ. हरी मोरे व उप प्राचार्य प्राध्यापक डॉ. सुनील बोरुडे कार्यक्रमआधिकारी कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक डॉ.अतुल दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत अजिंक्य लिंगायत,अजय वडणे, सुधीर लव्हाट,अनिकेत माळी, एम गणेश, एल राजशेखर यांनी वृक्षरोपण केले. व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगितले व शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी वृक्ष वृक्षांचा वाढदिवस साजरा करावा व वृक्षांची काळजी घ्यावी असे आव्हान केले. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांचे व कृषिदुतांचे आभार वैभव दिघे यांनी मानले.

प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रजासत्ताक दिन
Share the Post:
error: Content is protected !!