ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अशोकराव ढगे

नेवासा – तालुक्यातील सेंट मेरीज स्कूलमध्ये 75 वा गणतंत्र दिन सर्वांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे उपस्थित होते. डॉ ढगे म्हणाले की देशाचा इतिहास बलिदानाचा व योगदानाचा आहे. देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक देशभक्तांनी कारावास भोगला प्राणाची आहुती दिली आंदोलने केली, अशा सर्व आदरणीय देशभक्तांना व स्वातंत्र्यवीरांना प्रणाम करणे आपली कर्तव्य आहे. तदनंतर भारताने स्वातंत्र्योत्तर काळात विविध क्षेत्रात क्रांतिकारक प्रगती केली.

कृषी क्रांती औद्योगिक उन्नती अवकाश संशोधन शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रगती झालेली आहे. विशेषतः शास्त्रज्ञांनी संशोधनात वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव प्रगती केली शेतकऱ्यांनी अपार कष्ट केले, त्याचबरोबर सैनिकांनी देशाच्या रक्षणाची जबाबदारी बलिदान देऊन पार पडली त्या काळातील थोर नेत्यांनी देशाला योग्य दिशा दिली.

आजचा काळ गतिमान झाला आहे देशामध्ये जगाबरोबर स्पर्धा करण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे, त्यासाठी आजच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. विशेषतः वारे माप वाढणारी लोकसंख्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नेत्यांचा व त्यांच्या बगलबच्चांचा भ्रष्टाचार बेरोजगारी महिला वरील अत्याचार याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे, त्यामुळे युवकांनी विविध क्षेत्रात जागृत राहून कठोर परिश्रम करून देशाचे नाव जगामध्ये उज्वल करण्यासाठी कटिबद्ध व्हावे असे आवाहन डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सि.जोसी होत्या झेंडावंदनानंतर डोळ्याची पाळणे फेडणारे संस्कृतिक व विविध खेळांचे सामने झाले. विजयी टीम व वैयक्तिक विद्यार्थ्यांना प्राचार्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

अशोकराव ढगे
अशोकराव ढगे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अशोकराव ढगे
अशोकराव ढगे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अशोकराव ढगे
Share the Post:
error: Content is protected !!