ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ऋषिकेश माकोणे

शिरेगाव | अविनाश जाधव नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत माकोणे यांचे चिरंजीव डॉ ऋषिकेश माकोणे एम बी बी एस मेडिकल कोर्स साठी सहा वर्षापासून रशिया या देशात शिक्षण घेत आहेत. आय के बी एफ यु मेडिकल अँड इंजिनिअरिंग कॉलेज इंटरनॅशनल विद्यार्थी मधून गुरुवारी दि 25 जानेवारी रोजी रशिया देशाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन साहेब यांच्याशी प्रश्न उत्तराचा संवाद साधण्यासाठी एकमेव डॉ ऋषिकेश माकोणे यांची निवड झाली, त्यात भारत रशिया या देशांच्या चांगल्या संबंधावर वर ऋषिकेश ने प्रश्न विचारला होता, त्यावर राष्ट्राध्यक्ष पुतीन साहेब यांनी सविस्तर सकारात्मक असे उत्तरे दिले.

अतिशय प्रतिकूल परिस्थितुन अभ्यास करून हे यश डॉ ऋषिकेश याने मिळवले आहे, रशिया येथील बाल्टिक फेडरल विद्यापीठात शिक्षण घेत आहेत, अजून मेडिकल कोर्ससाठी सहा महिन्याचा अभ्यासक्रम बाकी असुन जून महिन्याच्या अखेरीस डॉ ऋषिकेश भारतात परतणार आहेत, त्याच्या या यशाबद्दल महंत हभप उद्धवजी महाराज मंडलिक, आमदार शंकरराव गडाख साहेब, सौ सुनीताताई गडाख, सभापती सुनीलभाऊ गडाख तसेच अंमळनेर पंचक्रोशीतुन मुळाथडी परिसरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

ऋषिकेश माकोणे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ऋषिकेश माकोणे
ऋषिकेश माकोणे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ऋषिकेश माकोणे
Share the Post:
error: Content is protected !!