ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रस्ता

नेवासा – मौजे घोगरगांव ता. नेवासा येथील मधुकर प्रल्हाद पाठे यांच्या कुटूंबाची ग.नं. २०२ व १४७ पै मध्ये शेत जमिन असुन ग.नं. २०२ मध्ये जाणारा पुर्वापार वागवहिवाट रस्ता ग.नं. १४७ पै.,२००, २०१,व १४६ पै. चे शेतमालक दिवाण बदाम पटारे, वगैरे शेतक-यांनी आडवुन, रस्त्यात दगड टाकुन, झाडे, ऊस पिक घेऊन, नांगरट करुन बंद केला होता त्या बाबत अर्जदार यांनी तहसिलदार नेवासा यांचेकडे वहिवाट रस्ता केस नं.०५/२०१४ दाखल केली होती त्यावर रस्ता खुला करुन देणे बाबत दि.१७/०२/२०१४ रोजी तहसिलदार यांनी आदेश दिला.

त्याआदेशावर सामनेवाले यांनी मे.उपविभागीय अधिकारी नगर भाग यांचेसमोर रिव्हिजन अपिल नं.६०/२०१४ चे दाखल केले व सदरचे रिव्हिजन अपिल देखील १५/१२/२०१६ रोजी नामंजुर झाले, याच काळात मा. तहसिलदार नेवासा यांचा आदेश ५/२०१४ हा बेकायदेशिर आहे असे ठरवुन मिळणे बाबत मे- सिव्हिल जज्ज सि.डी. साो. नेवासा यांचे कोर्टात रे.मु.नं. १५/२०१४ चा दावा दाखल केला, तोही या मे. कोर्टाने दिनांक २८/११/२०२३ रोजी चे आदेशाने नामंजुर केला, या दाव्यातील मनाई अर्ज देखील या मे. कोर्टाने नामंजूर केल्यानंतर दिवाण बदाम पटारे याने जिल्हा व सत्र न्यायालय नेवासा येथे त्यावर अपिल केले व तेथे देखील दि.२१/०४/२०२३ रोजी दि.चौ.अर्ज १९/२१ चा नामंजुर करण्यांत आला.

याच कालावधीत सामनेवाले यांनी मा.ना.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठ येथे सदर आदेशाविरुध्द रिटपिटीशन नं.४२०१/१७ दाखल केली त्यावर मा.ना. उच्च न्यायालयाने दि.०४/०७/२०१८ रोजी रे.मु.नं. १५/२०१४ चा दावा मेरिटवर डिसाईड करणेत यावा असा आदेश दिला व रिटपिटीशन डिस्पोज केली. सदर आदेशावरुन सदरचा १५/२०१४चा दावा दुतर्फा चौकशी होऊन साक्षी पुरावे नोंदवून दि. २८/११/२०२३ रोजी न्याय निर्णीत करुन तो रद्द झाल्याने व मा. तहसिलदार नेवासा श्री. संजय बिरादार यांचेकडील वरील सर्व आदेशाचे अवलोकन करुन क्र.कावि.रस्ता/४९८/२०२३ दि. २०/१२/२०२३ रोजी वहिवाट रस्ता केस नं. ०५/२०१४ चे व मा. न्यायालयाचे, मे.पोलीस अधिक्षक साो. अ.नगर यांचेकडील क्रं. जिविशा /स.शु.ब./१२२७/२०२४ दि.२३/०१/२०२४ चे आदेशाने सदरचा रस्ता पोलीस संरक्षणात मंडलाधिकारी भाग नेवासा बुाा श्री. माने, कामगार तलाठी घोगरगांव श्री. विजय लोंढे, यांनी कद.२५/०१/२०२४ रोजी खुला करुन देण्याचा आदेश झाला.

सदर आदेशाची अंमलबजावणी मंडलाधिकारी श्री. माने, कामगार तलाठी, श्री. विजय लोंढे, पोलीस अधिकारी श्री, तमनर, पो.कॉ. गणेश जाधव, पवार मॅडम यांनी संयुक्त कारवाई करुन रस्ता खुला करुन तो अर्जदार मधुकर पाठे यांचे कब्जा पावती व पंचनामा करुन ताब्यात देण्यांत आला. सदर केस मध्ये अर्जदाराचे बाजुने, अॅड बी बी कराळे, अॅड एस.टी.आरगडे, अॅड आर.डी. घावटे, अॅड जावळे, अॅड निरज नांगरे, यांनी कामकाज पाहिले.

यावर मा. तहसिलदार श्री. संजय बिराजदार यांनी यापुढे अशाप्रकारे बेकायदेशिर रित्या रस्ता अडवुन लगतच्या शेतक-यांचे हाल करणा-यावर, खैर केली जाणार नाही तर अशाच प्रकारची कारवाई करण्यांत येईल असा ईशाराही दिला आहे. व यापुढे अशाप्रकारे रस्ते अडवु नये, एकमेकांना सहकार्य करावे असेही सुचीत केले आहे.

newasa news online
रस्ता

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रस्ता
रस्ता

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रस्ता
Share the Post:
error: Content is protected !!