ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

स्वागत

भालगाव – अयोध्येत प्रभु श्रीरामांची बाल मुर्ती पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींच्या हस्ते श्रीरामांची जन्मभुमी असलेल्या तिर्थक्षेत्रातील नुतन मंदिरात २२ जानेवारीला विराजमान झाली. या शुभ मंगल प्रसंगी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठाधीपती गुरुवर्य शांतीब्रम्ह भास्करगीरी महाराजांसह राज्यातील साधु संतांंना विशेष निमंत्रन होते. महाराष्ट्रासह संपुर्ण राज्यातुन संत महंतांसह राजकिय पदाधीकारी या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रीत होते. त्याच प्रमाणे देशभरातुन श्रीरामभक्तांनीही अयोध्येत हजेरी लावली होती. विमान, रेल्वे, बस, खाजगी वाहनाने अनेक रामभक्त कार्यक्रमास उपस्थीत होते. तर काही सायकल प्रवास करुन तर काही भक्त पायी अयोध्येला या सोहळ्यासाठी उपस्थीत होते.

नेवासा तालुक्यातील भालगाव येथील श्रीराम भक्तांनी चक्क ३४०० किलोमीटरचा प्रवास मोटारसायकलवर केला. राम भक्तांनी १९ तारखेला दुपारी भालगावातुन अयोध्येसाठी श्री राम भक्तांनी दुचाकीवर प्रस्थान केले होते. श्रीराम भक्त संभाजी तनपुरे, संजय तनपुरे, भारत पवार, प्रशांत गायके या चार युवकांनी सुमारे ३४०० किलोमिटरचा प्रवास दुचाकीवर करण्याचा विक्रम केला आहे. त्यांचे प्रवास पुर्ण करुण दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी भालगावात आगमण झाले. भालगाव ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे शनिमंदिर चौकात स्वागत करुन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी सरपंच किशोर तनपुरे, ज्ञानेश्वर गायकवाड, गिरीष तनपुरे, महेश तनपुरे, जब्बार शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.

स्वागत
स्वागत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्वागत
स्वागत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्वागत
Share the Post:
error: Content is protected !!