ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आत्महत्या

नेवासा : माहेराहून पिकअप गाडी घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत. यासाठी विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी घोडेगाव येथील सासरच्या चौघांविरुद्ध सोनई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीस ताब्यात घेतले आहे. मोनिका रामकृष्ण पटारे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती. रविवारी तालुक्यातील देडगाव शिवारात पाटाच्या पाण्यात मोनिकाचा मृतदेह आढळून आला.

या संदर्भात मयताचे वडील राजेंद्र वालतुरे (रा. घुमनदेव, ता. श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले की, घोडेगाव येथील रामकृष्ण पटारे यांच्याशी ११ वर्षापूर्वी माझ्या मुलीचा विवाह झाला होता. मोनिकाला दोन मुली व

मुलगा आहे. मोनिकाचा पती रामकृष्ण शिवाजी पटारे, सासरा शिवाजी देवराव पटारे, सासू शांताबाई शिवाजी पटारे व भाया अनिल शिवाजी पटारे हे गेल्या काही दिवसांपासून पिकअप गाडी घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणावेत व चारित्र्याचा संशय घेऊन शारिरीक व मानसिक छळ करीत होते. त्यातूनच मोनिकास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पती रामकृष्ण यास ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शोकाकुल वातावरणात घोडेगाव येथे मयत मोनिकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

newasa news online
आत्महत्या

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आत्महत्या
आत्महत्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आत्महत्या
Share the Post:
error: Content is protected !!