ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

प्रजासत्ताक दिन

नेवासा – 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नेवासा तालुक्यातील धनगरवाडी येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढली.त्यात भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या राजमाता जिजाऊ,झाशीची राणी लक्ष्मीबाई,महाराणी ताराबाई,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश धारण करून मुली होत्या.त्यांच्यासोबत खास आकर्षण होते.श्रीराम,लक्ष्मण,हनुमान आणि माता सिता यांचा विद्यार्थ्यांनी वेश धारण केला होता.प्रभातफेरीत जागोजागी त्यांचे पूजन केले.प्रजासत्ताक दिनाच्या घोषणांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.

ध्वजस्तंभ पूजन व ध्वजारोहन सरपंच केदारनाथ बाबासाहेब आगळे यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गणेश लंघे हे होते.मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीनही भाषांमध्ये विद्यार्थ्यांची भाषणे झाली.वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी त्या-त्या चरित्रांचे मनोगत व्यक्त केले.राष्ट्रभक्तीपर गीतांवर लेझिम,नृत्य करत बालकांनी कार्यक्रमात प्राण भरला.मोबाईलच्या अती वापरावरील नाटीकेने उपस्थितांची मने जिंकली.

विविध गुणदर्शन गोष्ट सादरीकरण स्पर्धेत तालुक्यात प्रथम ज्ञानेश्वरी वाल्मिक जिवडे,तालुक्यात बालगट वत्कृत्व स्पर्धेत द्वितीय ईश्वरी खराडे,केंद्रस्तर हस्ताक्षरात प्रथम कार्तिकी रमेश कंठाळे,वेशभूषेसह सादरीकरणात प्रथम अदिती नितीन चव्हाण,वैयक्तिक गीतगायनात द्वितीय शुभदा काळे,किलबिल गट वत्कृत्व द्वितीय प्रियल खराडे,आराध्या नारळकर यांचा उपस्थित संभाजी आगळे, शंकर आगळे, जानदेव आगळे, राजेंद्र चरभरे, नागनाथ आगळे, सरपंच केदारनाथ आगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विविध कामांसोबत येत्या काळात केल्या जाणाऱ्या कामांचा लेखाजोखा सन्माननीय सरपंचांनी मांडला.आनंद घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

newasa news online
प्रजासत्ताक दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रजासत्ताक दिन
Share the Post:
error: Content is protected !!