ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हळदीकुंकू

नेवासा – आज दिनांक 27जानेवारी शनिवार रोजी प्रवरासंगम शाळेत हळदीकुंकू मोठ्या उत्साहात पार पडले.
दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत प्रवरासंगम शाळेत हळदीकुंकू व तिळगूळ हा कार्यक्रम आयोजित केला होता.स्टेज रंगीबेरंगी फुग्यानी सजवण्यात आले होते.आकर्षक फलकलेखन व रांगोळी रेखाटली होती.सकाळी प्रसन्न मंगलमय वातावरणात कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम उपस्थित माता-पालकांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली.माता-पालकाने अतिशय उत्साहात सहभाग घेऊन खेळाचा आनंद लुटला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरासंगम च्या विद्यमान सरपंच सौ.अर्चनाताई सुडके व प्रमुख पाहुण्या माता-पालक संघाच्या अध्यक्ष सौ.राणी सागर पाटील ,सौ.प-हाड ताई ,सौ.परभणे ताई या होत्या. कार्यक्रमात मातापालकाचे मनोरंजनासाठी स्वरा पाडंव व आराध्या मोहिम यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले .तर ईश्वरी मते व स्वरा दहितुले यांनी अतिशय सुंदर भाषण सादर केले.उपस्थित मातापालकानी बक्षीसाचा वर्षाव केला. शालेय बाह्य परिसर आकर्षक करण्यासाठी कर्जुले मॅडम यांनी आव्हान केले .या आव्हानाला उत्तम प्रतिसाद देत जवळपास पाच हजार रूपये देणगी जमा झाली.

आदरणीय प्रवरासंगमच्या सरपंच सौ.अर्चनाताई सुडके यांनी आपल्या भाषणातून महिलांनी एकमेकीला समजून घ्या..सहकार्य करा.आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्या.संस्कार द्या.तसेच शाळेला मिशन आपुलकी अंतर्गत सहकार्य करा असे आवाहन केले. सकाळची वेळ असून सुद्धा महिला पालकाची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात होती. सर्व प्रवरासंगम शिक्षकवृंदाच्या सहकार्यातून हळदीकुंकू कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
वर्षा भांबिरे व नूतन जोशी यांनी सर्व महिलांना हळदीकुंकू व तिळगूळ वाटप केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता कर्जुले-राऊत यांनी केले.तर आभार जयश्री कोल्हे यांनी मानले.

newasa news online
हळदीकुंकू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हळदीकुंकू
हळदीकुंकू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हळदीकुंकू
Share the Post:
error: Content is protected !!