ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मराठा आरक्षण

बेलपिंपळगाव – मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्व खाली मराठा आरक्षण ची लढाई जिंकल्याने सकल मराठा समाजच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मोठा आनंद साजरा करण्यात आला,
मराठा समाज ला आरक्षण मिळावे, या मागणी साठी मनोज जरंगे यांच्या नेतृत्व खाली गेल्या अनेक महिन्या पासून लढा सुरु होता मराठा समाजच्या मागण्या मान्य होत नसल्याने मराठा समाज चा मोर्च्या मुंबई येथे धडकला अखेर राज्य सरकारने मनोज जारंगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत त्या संदर्भातील अध्यादेश काढला आहे.

सर्व मागण्या मान्य झाल्याने सकल मराठा समाज ने स्वागत केले आहे त्या निमित्त ने गावातील सकल मराठा समाज यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मोठा आनंद साजरा केला या वेळी या आंदोलन साठी पाटिंबा म्हणून गावातील मा उप सरपंच बंडू चौगुले यांनी देखील पाच दिवस अमरण उपोषण केले होते त्या मुळे गावातील शिवनेरी ग्रुप यांच्या वतीने त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

या वेळी ग्रामपंचायत सरपंच कृष्णा शिंदे, बंडू चौगुले, वसंत कांगुणे,दत्तात्रय राऊत,ग्रामपंचायत सदस्य किशोर गारुळे,गणेश कांगुणे, बाबासाहेब रोटे, प्रसाद गटकलं, बाळासाहेब शिंदे, माऊली गटकलं, गणेश डुकरे, कल्याण शिंदे, गणेश धीर्डे,बाळासाहेब सरोदे,संजय कोठुळे, बाबासाहेब शिंदे, शिवाजी पटारे, राहुल शिंदे,दिलीप रोटे आदी सकल मराठा समाज उपस्थित होता तसेच गावातील मुस्लिम समाज वतीने मुमताज सय्यद यांनी मराठा समाज ला आरक्षण मिळाले म्हणून उप सरपंच चौगुले यांचा सत्कार केला या वेळी बोलताना चौगुले यांनी सांगितले कि जारंगे पाटील यांच्या सोबत कायम राहणार असून जेव्हा मराठा समाज साठी काही करण्याची वेळ येईल तेव्हा मी माग हटणार नाही व जरंगे यांना साथ देणार.

मराठा आरक्षण
मराठा आरक्षण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मराठा आरक्षण
मराठा आरक्षण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मराठा आरक्षण
Share the Post:
error: Content is protected !!