ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

स्वप्नील मापारी

नेवासा – नेवासा शहरातील कायम सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले युवा जनसेवक स्वप्नील राजेंद्र मापारी यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटनेच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किशोर घोळवे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड केली आहे. नेवासा शहरात विविध प्रश्नांवर आंदोलने करून विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच विधायक कामात स्वप्नील मापारी कायम अग्रेसर असतात.

तसेच त्यांचे सामाजिक व धार्मिक काम ही उल्लेखनीय असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. स्वप्नील मापारी हे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मापारी व नगरसेविका सौ.सिमा ताई मापारी यांचे चिरंजीव असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे नेवासा तालुक्याचे  आमदार शंकरराव गडाख पाटील,सभापती सौ.सुनीताताई गडाख व आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर दरदंले,प्रेस क्लब नेवासा कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी अभिनंदन केले असून समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही व प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल या उद्देशाने भविष्यात काम करणार असल्याचे स्वप्नील मापारी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

newasa news online
स्वप्नील मापारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्वप्नील मापारी
स्वप्नील मापारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्वप्नील मापारी
Share the Post:
error: Content is protected !!