ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

प्रजासत्ताक दिन

नेवासा – सौदाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी सौंदाळा गावचे सरपंच शरदराव आरगडे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम सरपंच शरद आरगडे यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला त्यानंतर ध्वजवंदन करण्यात आले व सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले त्यानंतर मुलांची शिस्तबद्ध संचलन व कवायतीचे विविध प्रकार हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले.

त्यानंतर श्री पागिरे सर यांनी शाळेची प्रस्ताविक पर माहिती दिली व नंतर मुलांची व मुलींची भाषणे झाली त्यानंतर शैक्षणिक, सांस्कृतिक ,आणि क्रीडा क्षेत्रात ज्या मुला मुलींनी विशेष प्राविण्य मिळवले होते त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पेन आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले . त्यानंतर ग्रामस्थांमधून रायभान अरगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेची झालेली प्रगती पाहून 2100 रुपये रोख स्वरूपात शाळेला मदत केली तसेच माझी तीन मुले देश सेवेसाठी देशाच्या सीमेवर आहेत अशी मुले प्रत्येकाच्या घरात जन्माला यावी .

त्यानंतर श्री भगवान आरगडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सरपंच शरदराव अरगडे यांनी आपल्या भाषणातून शाळेसाठी प्रिंटर कॉम्प्युटर बेंच ग्रामपंचायत मधून देण्याचे कबूल केली व यापुढे शाळेला कुठलीही मदत लागली तरी आम्ही कटीबद्ध राहू असे आश्वासन ही दिले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक शिक्षिका गावातील ग्रामस्थ उपसरपंच सदस्य शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रजासत्ताक दिन
Share the Post:
error: Content is protected !!