ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जमीन

नेवासा – नेवासा येथील नवीन तहसील कार्यालयचे इमारतीचे उद्घाटन अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पा यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी ,नेवाशाचे तहसीलदार, तालुक्यातील कामगार तलाठी सर्कल महसूल चे सर्व अधिकारी कर्मचारी तालुक्यातील सर्व नागरिक उपस्थित होते. बऱ्याच दिवसापासून रेंगाळत असलेले नेवासा तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकामसाठी साईट पट्टी कमी पडत होती यासाठी लगतचे जमिनधारक राजेंद्र, प्रमोद, संजय पोतदार यां बधुनी शासनास आपली तीन हजार स्क्वेअर फुट जमीन विना मोबदला बक्षीस पत्र करून दिलें.

या निमित्त पोतदार बंधूंचे ना. राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नेवाशाचे आदर्श माजी सरपंच कै . रामभाऊ पोतदार यांचे चिरंजीव असलेले हे बंधु आणि पोतदार परिवार नेहमी समाज उपयोगी कामासाठी अग्रेसर असतात . आपल्या वडिलांच्या आदर्शावर चालणारे पोतदार कुटुंबातील सर्व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. या दानशूर वृत्ती मुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे . नेवासा शहरातील सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली यावे येवला पॅटर्न राबवला जावा यासाठी राजेंद्र पोतदार यांनी पालकमंत्री यांना निवेदन दिले .

आपण नेवासे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तन-मन-धनाने प्रयत्न करणार असून नेवासा बाजारपेठ गत वैभव मिळावे यासाठी आगामी काळात माजी सरपंच कै. रामभाऊ पोतदार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रम राबवले जाणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना पोतदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पोतदार यांनी सांगितले.

जमीन
जमीन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जमीन
जमीन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जमीन
Share the Post:
error: Content is protected !!