ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गायनाचार्य

नेवासा – तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील जुन्या पिढीतील गायनाचार्य व श्री विठ्ठल रुख्मिणी आध्यत्मिक केंद्राचे अध्यक्ष हभप त्रिंबकभाऊ दिघे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. वैकुंठवाशी  त्रिंबकभाऊ यांच्या पच्यात दोन मुले,एक मुलगी,एक भाऊ,सूना,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.दत्तात्रय दिघे,दादासाहेब दिघे यांचे ते वडील तर पांडुरंग दिघे यांचे ते आजोबा होते.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते ब्रम्हलिन गुरुवर्य श्री बन्सी महाराज तांबे यांचे ते शिष्य होते. मंदिर निर्माण कार्यात त्यांनी मॅनेजिंग स्ट्रस्टी म्हणून काम पाहिले.मुख्य टाळकरी व गायनाचार्य म्हणून त्यांनी सेवा दिली. भजनात सांप्रदायिक चाली देऊन त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. गोणेगाव चौफुला येथील रामकृष्णाश्रमाच्या निर्मितीसाठी त्यांनी आपली वडिलोपार्जित जमीन वैकुंठवाशी हभप रामकृष्ण महाराज काळे गुरुजींना दान केली त्यामुळे कधी न कोमजणारा भक्तीचा मळा येथे फुलविला आहे,त्यांनी आयुष्यभर पंढरीची व आळंदीची वारी करणाऱ्या त्रिंबकभाऊ दिघे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायातील सेवेकऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

अंत्यसंस्कार समयी श्री विठ्ठल रुख्मिणी आध्यत्मिक केंद्र संचलित रामकृष्ण आश्रमाच्या वतीने हभप वेदमूर्ती भगवान महाराज जंगले शास्त्री,रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात,हभप गहिनीनाथ महाराज आढाव यांनी त्यांना श्रद्धांजली वाहून दुःख व्यक्त केले.यावेळी वारकरी संप्रदायातील वारकरी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गायनाचार्य
गायनाचार्य

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गायनाचार्य
गायनाचार्य

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गायनाचार्य
Share the Post:
error: Content is protected !!