ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बँक ऑफ बडोदा

नेवासा – नेवासा तालुक्यातील बँक ऑफ बडोदा सलाबतपूर शाखेच्या वतीने नेवासा खडका रोडवर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमासाठी गृहोपयोगी वस्तू भेट दिल्या.यावेळी सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते सदरच्या गृहपयोगी वस्तू वृद्धाश्रम चालकाकडे सुपूर्त करण्यात आल्या.शरणपूर वृद्धाश्रम प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सलाबतपूर शाखेचे शाखा व्यवस्थापक संतोष खांडीझोडे हे होते तर बँकेचे कृषी अधिकारी राजेश मोरे,अमोल लोखंडे वृद्धाश्रमाचे संस्थापक रावसाहेब मगर,कमिटीचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखिळे,

नेवासा फाटा येथील सुकल्पना मल्टीटेच्या मीनाताई औताडे,पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नळघे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भोंगळ,अनिल दळवी,वृद्धाश्रम व्यवस्थापक संतोष मगर,भोजन कक्ष प्रमुख सौ.ज्योतीताई मगर यावेळी उपस्थित होते.यावेळी वृध्दाश्रम कमिटीचे संपर्क प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रमुख अतिथींची स्वागत करून प्रास्ताविक केले.वृद्धाश्रमास प्रथमच बँकेच्या वतीने गृहपयोगी वस्तू भेट दिल्याबद्दल बँक ऑफ बडोदाच्या सर्व अधिकऱ्यांचा वृद्धाश्रमाच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला.

सदर प्रसंगी बोलताना बँक ऑफ बडोदाचे अधिकारी संतोष खांडीझोडे म्हणाले की गरज असणाऱ्यांना मदत करणे हा उपक्रम राबविण्यात येतो म्हणून शरणपूर वृद्धाश्रमाला गॅस शेगडी व शंभर वृद्धांच्या स्वयंपाकासाठी पातेले व इतर साहित्य भेट देत असल्याचे सांगून यापुढे ही गरज ओळखून मदत करत राहू अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली.वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित मान्यवर अतिथींचे आभार मानले.

बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बँक ऑफ बडोदा
Share the Post:
error: Content is protected !!