ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पिढी

नेवासा – शिक्षकांनी लहानपणी केलेल्या चांगल्या संस्कारामुळे उद्याची नवी पिढी घडणार असते ज्ञानदानाबरोबर राष्ट्रभक्ती ,देशभक्तीचे धडे बालपणी विद्यार्थ्यांना मिळाल्यास उत्तम राष्ट्रभक्त देश सेवक देशाला मिळू शकतात असे मत पत्रकार अशोक डहाळे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर ,नेवासा फाटा येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे निवृत्त क्रीडाशिक्षक प्राध्यापक कडू बाळ देशमुख होते.

प्राध्यापक कडू देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. युनिफॉक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सी ए संदीप देशमुख यांच्या प्रयत्नामुळे शाळेच्या प्रांगणात सुमारे एक लाख 50 हजार रुपयाचे पेवर ब्लॉक तसेच सुमारे 47 हजार रुपयांच्या सोलर सिस्टिम सेवा उपलब्ध झाली. त्याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक म्हस्के यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास नेवासा खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, माजी मुख्याध्यापिका जराड मॅडम ,माजी मुख्याध्यापिका बेहेले मॅडम, मेजर संजय जराड, नगरसेवक जितेंद्र कुर्हे, इमरान शेख, बापूसाहेब तळपे इत्यादी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेचे देशमुख सर यांनी आभार मानले.

newasa news online
पिढी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पिढी
पिढी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पिढी
Share the Post:
error: Content is protected !!